राखी सावंत व आदिल खान यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. राखीने पोलिस तक्रार केल्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर राखी सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. इतकंच नव्हे तर तिने आदिलच्या गर्लफ्रेंडबाबतही तिने भाष्य केलं. तनू नावाच्या मुलीबरोबर आदिलचं अफेअर असल्याचा राखीने दावा केला आहे.
कोण आहे तनू?
आदिलची गर्लफ्रेंड तनूमुळे माझ्या वैवाहिक आयुष्यामध्ये वादळ आलं असे आरोप राखीने केले. शिवाय आदिल व त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही तिने दिली. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार तूनचं खरं नाव निवेदिता चंदेल असं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचं नाव तनू चंदेल असं आहे. पण तनूने स्वतः या प्रकरणाबाबत भाष्य केलेलं नाही.
राखीने तनू या नावाचा खुलासा केल्यानंतर सोशल मीडियावर आदिल व तिचे अनेक फोटो व्हायरल झाले. मिस उत्तर प्रदेशचा किताब तनूने पटकवला आहे. तर ती कलाक्षेत्रामध्येही कार्यरत आहे. ‘बिग बॉस १६’ शोचा स्पर्धक शालीन भानोतबरोबर तनूने एका चित्रपटामध्ये कामही केलं आहे.
२०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव के फंडे’ चित्रपटात तनू मुख्य भूमिकेत होती. मुळची इंदौरची असणारी तनू आयआयटी उत्तीर्ण आहे. शिवाय ती स्वतः एक व्यावसायिकाही आहे. राखीने तनूवर अनेक आरोप केले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना तनूने आदिलशी जवळीक साधली असं राखीने म्हटलं. शिवाय तनूने तिला फोन केला असल्याचंही राखीने प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं.