‘शिवा’ (Shiva) व ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या दोन मालिकांचा महासंगम दाखविला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवा, दिव्या, त्यांची आजी, आशू व त्याचा मित्र हे साताऱ्याला गेले आहेत. आजीची जमीन कोणीतरी बळकावल्याचे समजताच ते साताऱ्याला गेले आहेत. तिथे ते सूर्याच्या घरी राहतात. आता शिवा व तुळजा त्या जमिनीचे कागद मिळविण्यासाठी काय करणार आहेत, हे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक कोण?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तुळजा व शिवा डॅडींच्या घराबाहेर दिसतात. त्या दोघी डॅडींच्या घरात शिरतात. “आपण दोघी मिळून आजीला तिला जमीन परत मिळवून देऊ”, असे तुळजा शिवाला सांगताना ऐकायला मिळते. याच प्रोमोमध्ये पाहायला की, मिळते की डॅडी शेकोटीसमोर बसले आहेत. ते शत्रूला म्हणतात, “मला नाही वाटत की, ती पोरगी गप्प बसेल. एक काम करा जमिनीचे कागदपत्रे घेऊन या.” तुळजा व शिवा लॉकरपर्यंत पोहोचतात; पण त्याला लॉक असल्यामुळे त्यांना तो लॉकर उघडता येत नाही. डॅडींच्या बोलण्यानंतर शत्रू आजीच्या जमिनीची कागदपत्रे घेतो; पण लॉकरला कुलूप लावायचेच विसरतो. तो चाव्याही तिथेच ठेवून जातो. मग शिवा व तुळजा हळूच तिथे येतात. तुळजा तिथे कागद शोधते आणि तर काही कागद बघितल्यावर तिला धक्काच बसतो. समोर असलेले कागद बघत ती म्हणते, “सूर्यकांत जगताप. म्हणजे या कोट्यवधी संपत्तीचा मालक सूर्या आहे?”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “शिवाच्या मदतीने तुळजा पोहोचणार संपत्तीच्या पेपर्सपर्यंत…!”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आजीची जमीन डॅडींनी बळकावली आहे. ती परत मिळवण्यासाठी आजी तिच्या कुटुंबासह साताऱ्याला आली आहे; मात्र डॅडींनी तिची जमीन परत देण्यास साफ नकार दिला आहे. आता ती जमीन मिळवण्यासाठी शिवा व तुळजा एकत्र येऊन प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, याचदरम्यान आता तुळजासमोर मोठे सत्य आले आहे.
दरम्यान, आता तुळजासमोर जे सत्य आले आहे, त्यानंतर ती पुढे काय करणार? शिवाच्या आजीच्या जमिनीचे कागद त्या दोघी कशा मिळवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.