अभिनेता शशांक केतकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. शशांक जितका त्याच्या सहज, सुंदर अभिनयामुळे चर्चेत असतो तितकाच तो कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी परखड मतांमुळे चर्चेत असतो. नुकताच शशांकने एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी लेक ऋग्वेदसाठी आलेल्या जाहिराती का नाकारल्या? याविषयी शशांक स्पष्टच बोलला.
‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत शशांकने साकारलेली अक्षय मुकादमच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच शशांकने मुलाला आलेल्या जाहिराती का नाकारल्या? याविषयी बोलला आहे. नुकताच अभिनेत्याने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याबरोबर रॅपिड फायर खेळ खेळण्यात आला. यादरम्यान शशांक मुलाला आलेल्या जाहिरातीविषयी स्पष्टच बोलला.
हेही वाचा – “ताक आवडत नव्हतं म्हणून आईने थेट बाथरुममध्ये नेलं अन्…”; शशांक केतकरने सांगितला ‘तो’ किस्सा
अभिनेता शशांक केतकर म्हणाला, “मी ऋग्वेदसाठी आलेल्या अनेक जाहिरातींना नकार दिला. तेलाच्या, पावडरच्या, पुस्तकांच्या, डायपरच्या अशा जाहिराती आल्या होत्या. पण आम्ही नाही म्हणालो. कारण ती लहान मुलं कपडे न घातलेलं दाखवायचं आणि त्याच्यातून आम्ही पैसे कमावयाचे, ही भावना आम्हाला काही पटली नाही. हा आमचा विचार आहे. तो खूप मोठा झाला, त्याला कळायला लागलं तर तो लोकांसमोर येईलचं.
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’सह ‘या’ मालिकांच्या टीआरपीमध्ये झाली घसरण; ‘या’ आहेत टॉप १० मालिका
दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो मराठी चित्रपटांमध्येही झळकला आहे. तसेच आता तो हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे. हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजनंतर तो करण जोहरच्या सीरिजमध्ये झळकणार आहे.