Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा आठवडा सुरळीत पार पडला असला तरी रितेश देशमुखने मात्र ‘भाऊच्या धक्क्यावर’ सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. अरबाज पटेल, निक्की तांबोळी यांना रितेशने खूप झापलं. एवढंच नव्हेतर आठवड्याभरातील निक्कीच्या वर्तणुकीवरून आणि नियमभंग केल्यामुळे तिला दोन मोठ्या शिक्षा दिल्या. संपूर्ण पर्व निक्की कॅप्टन होऊ शकणार नाही. तसंच येत्या आठवड्यात तिला घरातील सर्व सदस्यांची भांडी घासावी लागणार आहेत. जर या शिक्षेचं पालन केलं नाहीतर निक्कीला थेट नॉमिनेट केलं जाणार आहे. त्यामुळे निक्की आता शिक्षेचं पालन कशाप्रकारे करतेय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण अशातच गणपती विशेषमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिली वाइल्ड एन्ट्री होत आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात कोणाची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान अनेक नावं समोर आली. त्यात लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नाव अधिक घेतलं जात होतं. पण गौतमी पाटीलने ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर नाकारल्याचं थेट सांगितलं. त्यामुळे नेमकं कोण वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस मराठीत’च्या घरात प्रवेश करणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आज यावरचा पडदा उघडला जाणार आहे. कारण आज एका रांगड्या गडीची वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जबरदस्त एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा – Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो

‘कलर्स मराठी’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकाच्या एन्ट्रीची झलक दाखवण्यात आली आहे. तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा…अस्सल फौलाद घालणार बिग बॉसच्या घरात राडा, अशी ओळख वाइल्ड कार्ड स्पर्धकाची करून देण्यात आली आहे.

वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कोल्हापुरचा संग्राम चौगुले असल्याचा अंदाज वर्तवला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘संग्राम भाऊ पण निक्कीचा नादी लागू नको म्हणजे झालं’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘आता अरबाजला आसमान दाखवायला थोडाच वेळा बाकी…होऊ द्या खर्च.’ तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘आता संग्राम चौगुले वाट लावणार.’

हेही वाचा – दीपिका पादुकोण गणेश चतुर्थीच्या दिवशी देणार बाळाला जन्म, डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल, पाहा Video

दरम्यान, शनिवारी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून घनःश्याम दरवडे एलिमिनेट झाला. यावेळी अरबाजसह काही स्पर्धक भावुक झालेले पाहायला मिळाले. महत्त्वाचं म्हणजे एखादा स्पर्धक घराबाहेर झाला तर तो म्युच्युअल फंडच्या कॉइनचा वारसदार म्हणून घरातील स्पर्धकांपैकी एकाला निवडतो. घनःश्यामने म्युच्युअल फंडच्या कॉइन वारसदार म्हणून अरबाज किंवा निक्कीला नव्हे तर सूरज चव्हाणला निवडला. घनःश्यामचा हा निर्णय ऐकून सगळ्यांच धक्का बसला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild card entry will take place in bigg boss marathi house today pps