‘पारू’ ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेत सतत काहीतरी घडताना दिसते. आदित्य-पारूची मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते आहे. प्रत्येक वेळी आदित्यवर आलेल्या संकटातून पारू त्याला बाहेर काढताना दिसते आणि आदित्यदेखील पारूला वेळोवेळी मदत करताना दिसतो. आता या मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये पारूविषयीच्या प्रेमाची जाणीव आदित्यला होईल का, अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य पारूच्या प्रेमात पडणार का?

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आदित्य पारूला म्हणतो, “तुला येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अगदी मारुती मामासुद्धा नाही.” त्यानंतर पुढे पाहायला मिळते की, आदित्य पारूच्या घरी गेला आहे. तिथे पारूचे वडील आहेत. आदित्य त्यांना विचारतो, “काय झालं मामा? पारूच्या आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या दिवशी तुम्ही तिला जायला नकार देताय. काय कारण आहे मामा?” त्यावर मारुती काहीही बोलत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, प्रीतम त्याच्या घराच्या गॅलरीमध्ये उभा आहे आणि त्याचे बाहेरच्या दिशेला तोंड आहे. तो मागे न बघता म्हणतो, “जेव्हा मी म्हटलं की, ती अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येत नाहीये. तेव्हा किती नॉर्मल रिअॅक्ट झालास तू. आणि जेव्हा मी अवॉर्ड फंक्शनला पारू जाणार नाही, असं म्हटलं तेव्हा किती शॉक झालास. तू ही जी काही काळजी दाखवतोयस ना ती कळतेय मला.” प्रीतम आदित्य समजून हे सर्व बोलत आहे. मात्र, तिथे आदित्य नाही, तर अनुष्का हे बोलणे ऐकत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पारूविषयीच्या आपल्या प्रेमाची जाणीव आदित्यला होईल का ?”, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: “एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे”, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानिमित्ताने सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…

आता अनुष्काने प्रीतमचे हे बोलणे ऐकल्यानंतर आता पुढे ती काय करणार, पारू व आदित्यच्या नात्यात अनुष्कामुळे दुरावा निर्माण होणार का, आदित्य पारूच्या प्रेमात पडला आहे का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.