‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. लीला व एजे प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यांच्याप्रमाणेच आजी, दुर्गा, यश, कालिंदी, लक्ष्मी, सरस्वती, विश्वरूप ही आणि इतर सर्व पात्रे प्रेक्षकांच्या जवळची बनली आहेत. प्रत्येक पात्र त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते, त्यांच्या मनात जागा करते. आता या मालिकेत नवीन वळण येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेच प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

यशचे सत्य एजेसमोर येणार?

झी मराठी वाहिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, दवाखान्यात अॅडमिट असलेल्या रेवतीच्या बेडशेजारी यश आला आहे आणि तो खूप रडत आहे. तो रडत रडत म्हणतो, “आय ॲम सॉरी रेवती. तुला हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मी तुझा खूप मोठा विश्वासघात केला आहे. तो तिचा हात हातात घेऊन रडत असतो. तितक्यात एजे येतो. तो त्याच्याकडे आश्चर्याने बघत, यश? असे म्हणतो. त्याला पाहून यशला धक्का बसतो. दुसरीकडे लीलाला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळतो आणि ती घरी जाते. तेव्हा तिला कोणी दिसत नाही. ती विश्वरूपला विचारते की, विश्वादादा मी घरी येतेय, हे तू सांगितलं नव्हतंस का इथे कोणाला?” तितक्यात आजी बाहेर येते. ती थेट लीलाशी न बोलता, विश्वरूपला म्हणते, “आलास विश्वरूप? व्यवस्थित काळजी घ्यायची, व्यवस्थित औषधं वगैरे दे.” आजीला पाहून लीलाला आनंद होतो. ती तिला मिठी मारते; मात्र तिला काही प्रतिसाद मिळत नाही. लीला आजीला विचारते, “आजी काही झालंय का?” त्यानंतर आजी तिच्याकडे रागाने पाहत असल्याचे दिसत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना, ‘अभिरामसमोर सत्य येणार का?’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, रेवती व लीलाचा अपघात हा किशोरने घडवून आणला आहे. मात्र, आता तो अपघात स्वत: लीलाने घडवला असल्याचे किशोरची पत्नी दुर्गा आजीला सांगते. एक व्हिडीओ ती आजीला दाखवते. त्यामध्ये लीला म्हणत असते की, काहीही झालं, माझा जीव जरी गेला तरी मी रेवती व यशचं लग्न लावून देईन. आजीला दुर्गाचे म्हणणे पटते आणि ती लीलावर नाराज होते. यश व रेवतीचे लग्न व्हावे म्हणून लीला प्रयत्न करत असते. कारण- त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. मात्र, एजे श्वेताच्या लग्नाची जबाबदारी घेतो आणि तिचे लग्न दुर्गाचा भाऊ यशबरोबर ठरवतो. आता त्यानंतर हे सर्व पाहायला मिळत आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये एजेला रेवतीच्या भावना समजणार असल्याचे दिसत आहे. लीला मात्र साखरपुडा थांबविण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबते. ती वेश बदलून साखरपुड्याला जाते आणि यशला गायब करते.

हेही वाचा: Bigg Boss 18: रजत दलाल आणि दिग्विजय सिंह राठी यांच्या मैत्रीत पडली फूट, पाहा नवा प्रोमो

दरम्यान, एजेने यशला रेवतीजवळ पाहिल्यानंतर तो त्याला खरे सांगणार का, आजीला सत्य समजणार की त्यांच्यातील गैरसमज वाढणार, अखेर यश व श्वेताचा साखरपुडा कसा थांबणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.