रिंकू भाभी, गुत्थी आणि डॉ. गुलाटीसारख्या पात्रांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर कपिल शर्मामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१८ मध्ये कपिल शर्माशी त्याचे जोरदार भांडण झाले होते त्यानंतर त्याने त्याच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो सोडला होता. आता सुनीलने लवकरच कपिलबरोबर काम करताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील ग्रोव्हरला कपिल शर्माबरोबर पुन्हा काम करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. शिवाय काही वर्षापूर्वी कपिल शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुनीलसाठी त्याच्या शोचे दरवाजे नेहमीच उघडे असतील. याविषयी उत्तर देताना सुनील म्हणाला, “मी सध्या माझ्या कामात व्यस्त आहे आणि मी जे करतोय त्यात आनंदी आहे. तो देखील त्याच्या व्यापात आहे आणि चांगले काम करत आहे. मी सध्या ज्या फेजमध्ये आहे त्याचा अनुभव घेत आहे त्यामुळे आत्तातरी माझ्या मनात आणि डोक्यात दूसरा कोणताच विचार नाही.”

आणखी वाचा : “हिला पद्मश्री पुरस्कार कशासाठी?” असं विचारणाऱ्या ट्रोलर्सना रवीना टंडनचं चोख उत्तर, म्हणाली…

मध्यंतरी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद खूप टोकाला गेले होते. त्यानंतर कपिलने फेसबुकवरून सुनील ग्रोवरची माफी मागत सारे काही सुरळीत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बऱ्याच लोकांनी यांच्यातील भाडणं, गैरसमज मिटवायचा प्रयत्न केला होता, पण कितीही पैसे दिले तरी कपिलबरोबर काम करणार नाही या भूमिकेवर सुनील ग्रोव्हर ठाम होता.

सुनील ग्रोवर सध्या बरेच प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तो नुकताच ‘युनायटेड कच्चे’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. मानव शाह यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. ८ भागांची ही सीरिज यूकेमध्ये शूट करण्यात आली होती. सुनील आता आता शाहरुख खानच्या ‘जवान’मध्येही झळकणार आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा ​​देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात संजय दत्तचाही कॅमिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sunil gorver work with kapil sharm after 5 years gap comedian gives clarification avn