छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षक नित्यनियमाने बघत असतात. कलर्स वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका आता लवकरच निरोप घेणार आहे. या निमित्ताने मालिकेच्या लेखकाने भावूक पोस्ट शेअर केली आहे. ती मालिका म्हणजे राजा ‘राजा राणीची गं जोडी’, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होत. मालिकेचे शेवटचे दोन दिवस आहेत. लेखक, दिग्दर्शक , अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिन्मय मांडलेकर गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने असं म्हंटल आहे, ‘आपली काही काम आपल्याला खूप आवडतात. ‘राजा राणीची गं जोडी’च जग माझ्यासाठी तसंच आहे. रणजित संजू खूप मिस करेन. ४ वर्ष आणि ८२३ भागांचा हा प्रवास फारच विलक्षण होता. खूप प्रेम आणि आभार’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाना पाटेकरांचे ओटीटी विश्वात पदार्पण; दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर पुन्हा करणार काम

या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मनिराज पवार हे मुख्य भूमिकेत आहेत सर्वसामान्य मुलगी ते आयपीएएस संजू असा विलक्षण प्रवास प्रेक्षकांनी बघितला आहे. या मालिकेतील रणजित आणि संजू यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होत. ही मालिका संपत असल्याने साहजिकच या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.

चिन्मय मांडलेकरने मालिकेची कथा लिहली होती. रणजित आणि संजुची प्रेमकथा यात दाखवण्यात आली होती. या मालिकेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शनने केली आहे. चिन्मय मांडलेकरने याआधी ‘तू तिथे मी’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘तू माझा सांगाती’, या मालिकांचे लेखन केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer actor chinmay mandlekar shared emotional post for famous serila raja ranichi g jodi spg
Show comments