छोट्या पडद्यावरील ‘ये है मोहब्बते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे रुहानिका. या मालिकेत रुही हे पात्र साकारुन तिने लोकप्रियता मिळवली. रुहानिकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
रुहानिकाने नुकतंच स्वत:चं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत याची माहिती तिने चाहत्यांना दिली आहे. अवघ्या १५व्या वर्षी कोट्यवधींचं घर खरेदी केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंटमध्ये रुहानिकाचं अभिनंदन करत तिचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा>> रितेश देशमुख आईला जिनिलीयाची मास्तरीणबाई का म्हणाला? पाहा व्हिडीओ
रुहानिकाने १५व्या वर्षी घर खरेदी करण्याचं क्रेडिट तिच्या आईला दिलं आहे. “वाहेगुरुजी व माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आज मला घर खरेदी करता आलं. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नव्हतं. यात माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे. तिने पैशाची योग्य गुंतवणूक केल्यामुळे आज मला घर खरेदी करता आलं. ही फक्त सुरुवात आहे. मला आणखी खूप काही करायचं आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण मी माझं घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकले, त्याचप्रमाणे तुम्हीही करु शकता. तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा, एक दिवस नक्कीच ते सत्यात उतरेल”, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> “अशोक सराफ आजही…”, निवेदिता यांनी पतीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
रुहानिकाने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘ये हे मोहब्बते’, ‘ये हे चाहते’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. ‘झलक दिखला जा’ शोमध्येही तिने सहभाग घेतला होता.