बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा रिलेशनशिपमधील वादावरुन गेले कित्येक दिवस चर्चेत आहेत. राजीवने पत्नी चारूचं अभिनेता करण मेहराबरोबर अफेअर सुरू असल्याचं म्हटलं होतं. याबाबत आता खुद्द करणनेच खुलासा केला आहे.

बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत करण मेहराने राजीवने केलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “हा मुर्खपणा आहे. राजीव कोणत्या करण मेहराबाबत बोलत आहे, याबद्दल मला माहीत नाही. माझा चारू असोपाबरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आम्ही दहा वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कातही नाही आहोत”. छोट्या पडद्यावरील ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेत चारू असोपा आणि करण मेहरा यांनी एकत्र काम केलं होतं.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

राजीव सेनने एका मुलाखतीदरम्यान चारु आणि करण मेहराचं अफेअर असल्याचं म्हटलं होते. त्यांनी एकत्र रील व्हिडीओही बनवला असल्याचं तो म्हणाला होता. “माझ्या कुटुंबियांनी चारूला पाठिंबा दिला तरीही ती माझ्यावर असे घाणेरडे आरोप करत आहे. ती माझा मानसिकरित्या छळ करत आहे. मी तिला कधीच माफ करणार नाही”, असंही तो म्हणाला होता.

हेही वाचा >> ड्रेसला सेफ्टी पिन लावल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

चारू असोपानेही एका मुलाखतीदरम्यान राजीववर आरोप केले होते. राजीव संशयी वृत्तीचा आहे, असं ती म्हणाली होती. “माझ्या सह कलाकारांना माझ्यापासून दूर राहण्यासाठी तो मेसेज करायचा. माझं ड्रायव्हर बरोबर अफेअर असल्याचा आरोपही त्याने केला होता”, असं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.

Story img Loader