काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री खुशबू तावडे, अशोक शिंदे यांची मध्यवर्ती भूमिका असलेली ही मालिका आता घराघरात पोहोचली आहे. नवनवीन ट्वीस्टमुळे मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता या मालिकेत ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री होणार आहे.
‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्या प्रोमोमध्ये श्रीनूला खोताच्या घरात मानाच स्थान मिळवून देण्यासाठी दाईजी लालीला वचन देताना दिसत आहेत. दाईजी म्हणतात की, श्रीनूचं या घरचा जावई होणार. यावर लाली म्हणते, “पण दादा आणि उमा तुझा शब्द पाळतील का?” दाईजी म्हणते, “रघुनाथ आणि उमा माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. पण काहीही झालं तरी निशीचं लग्न श्रीनूशीच होणार.” हे ऐकून लाली म्हणते, “आपल्या श्रीनूचा आणि निशीचा जोडा लाखात एक दिसेल.”
हेही वाचा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीत काय घडणार?, पाहा प्रोमो
हे सगळं दुसरं असताना दुसऱ्याबाजूला श्रीनू ओवीला भेटवस्तू देताना दिसत आहे. तर निशीची एका नवीन व्यक्तीबरोबर भेट होताना पाहायला मिळत आहे. ही व्यक्ती म्हणजेच ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतलं नवं पात्र आहे. हे पात्र ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता नीरज गोस्वामी साकारणार आहे.
हेही वाचा – आलिया भट्ट-रणबीर कपूर लेकीचा चेहरा का दाखवत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं केव्हा दाखवणार राहाची पहिली झलक
दरम्यान, काल ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘तू चाल पुढं’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. यावेळी सर्वोत्कृष्ट भावंडं – ओवी-निशी, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – रघुनाथ, सर्वोत्कृष्ट सून – उमा, सर्वोत्कृष्ट आई – उमा, सर्वोत्कृष्ट वडील – रघुनाथ, सर्वोत्कृष्ट कुटुंब – खोत कुटुंब असे एकूण सहा पुरस्कार ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेला मिळाले.