टेलिव्हिजन जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. तिने इंदूरमधील राहत्या घरी गळफास घेतला. तिच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वांनाचा धक्का बसला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली ही गेल्या वर्षभरापासून इंदूरमध्येच राहत होती. तिने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सध्या तेजाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच तिने लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांनी जप्त केली आहे.
आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन

वैशाली ठक्कर हिने आत्महत्या का केली? यामागचे नेमकं कारण काय? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने नेमकं काय लिहिलंय? याबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. वैशाली ठक्करच्या निधनाच्या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेक चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : “माझा बाबू आता या जगात नाही…” ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याच्या १९ वर्षीय मुलाचे निधन

वैशाली ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते. वैशालीने २०१५ मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या कार्यक्रमात तिने संजना हे पात्र साकारले होते. त्यानंतर ती ‘ये है आशिकी’ या मालिकेतही झळकली होती.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेत तिने अंजली भारद्वाज ही भूमिका साकारली होती. त्याद्वारे ती घराघरात पोहोचली. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्याबरोबर तिने ‘सुपर सिस्टर’, ‘मनमोहिनी सीझन २’ मध्येही उत्तम काम केले होते.