छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेतील ओम व स्वीटूच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. अभिनेता शाल्व किंजवडेकरने या मालिकेत ओमची भूमिका साकारली होती. शाल्वला खऱ्या आयुष्यात स्वीटू भेटली आहे. लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे.
शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. शाल्व व श्रेयाच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच त्यांचा मेहेंदी सोहळा पार पडला. शाल्व व श्रेयाच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी शाल्व व श्रेयाने पिवळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ट्युनिंग केलं होतं.
हेही वाचा>> आदिल खानच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळाली धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “माझे व्हिडीओ…”
![shalva kinjawadekar wedding](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/02/shalva-kinjawadekar-wedding.jpg?w=442)
शाल्वने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रेयाचं सौंदर्य खुलून आलं होतं. शाल्व व श्रेयाच्या मेहेंदी सोहळ्यासाठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही हजेरी लावली होती.
हेही वाचा>> “राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर सलग तीन चित्रपट केल्यामुळे…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘तो’ किस्सा
शाल्व व श्रेया गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्रेया ही एक स्टायलिस्ट आहे. शाल्वने मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शाल्व व श्रेया सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.