‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. वर्षभर चालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली होती. अभिनेत्री अन्विता फलटणकर, शाल्व किंजवडेकर, शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती गोखले, मीरा जगन्नाथ, प्रिया मराठे, उदय साळवी, किशोरी अंबिये अशी तगडी कलाकार मंडळी या मालिकेत झळकली होती. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत मोहित परबची भूमिका साकारलेला अभिनेता निखिल राऊत बाबा झाला आहे. निखिलने ही आनंदाची बातमी नुकतीच सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

अभिनेता निखिल राऊतला २७ मेला गोंडस मुलगा झाला आहे. या नवजात गोड बाळाबरोबरचे फोटो शेअर करत निखिलने आनंदाची बातमी दिली आहे. निखिलने लिहिलं आहे, “आमच्या लाडक्या मुलाचं आगमन झाल्याचं जाहीर करताना खूप आनंद होतं आहे. २७ मे २०२४ला आमच्या बाळाचा जन्म झाला असून त्याच्या जन्मामुळे आमच्यावर कृपा झाली आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम त्याच्यावर असू द्या. विनम्र, मयुरी आणि निखिल राऊत.”

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानची ‘तेरे नाम’मधील राधेसारखी हेअरस्टाइल, रणबीर कपूरबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

पुढे अभिनेत्याने आभार व्यक्त करत लिहिलं आहे, “आम्ही सांताक्रूझ पश्चिम येथील सूर्या हॉस्पिटल आणि विशेषतः डॉ. अमीत पत्की सरांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग आमच्या आयुष्यात आला. श्री स्वामी समर्थ.”

हेही वाचा – “माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”

निखिलच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, राधा सागर, सारिका नवाथे, निलेश साबळे, अदिती द्रविड, धनश्री काडगांवकर, अद्वैत दादरकर, विवेक सांगळे, तेजस बर्वे, अशा बऱ्याच कलाकारांनी निखिल व त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर, पाहा Inside फोटो

दरम्यान, निखिल राऊतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘चॅलेंज’ या नाटकात त्याने साकारलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. निखिलने ‘फर्जंद’, ‘फतेशिकस्त’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.