Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात यंदा छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण सहभागी झाली होती. मात्र, घरातील वाद, भांडणं या गोष्टी सहन न झाल्याने तिने दुसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’कडे घरी जाण्याची मागणी केली होती. यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर योगिताने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं. घरात एकंदर तिचा अनुभव कसा होता. याबद्दल ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना योगिताने प्रतिक्रिया दिली आहे.

योगिता ( Yogita Chavan ) सांगते, “प्रेक्षक मला एवढा सपोर्ट करतील हे मला खरंच माहिती नव्हतं. पण, एलिमिनेट झाल्यावर मी बाहेर आले आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या. माझ्या विरोधात एकही कमेंट ट्रोल करणारी नव्हती आणि यासाठी मी सदैव ग्रेटफुल आहे. मी ‘बिग बॉस’चा प्रचंड आदर करते कारण, त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली. अनेकदा माझी समजूत काढली आणि मी सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न केले. हा गेम खूप जास्त उत्सुकता वाढवणारा आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी एक वेगळं टॅलेंट लागतं. कारण, आत राहणं खरंच खूप अवघड आहे. माझी एवढीच इच्छा आहे की, टीम ‘बी’ पैकी कोणीतरी जिंकलं पाहिजे आणि मला खात्री आहे की, त्यांच्यापैकीच कोणीतरी जिंकेल. मला खूप गोष्टी आतमध्ये शिकायला मिळाल्या आणि भावनिकदृष्ट्या मी खंबीर झाले.”

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Jugeshinder Singh, CFO of Adani Enterprises.
Hindenburg : “कितने गाझी आये, कितने गाझी गये”, हिंडनबर्ग बंद करण्याची घोषणा; आदाणी समूहाचा टोला
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…

हेही वाचा : “निक्की तू किती Hopeless आहेस हे जनतेला…”, रक्षाबंधनाच्या दिवशी नात्यात फूट! घन:श्यामने सुनावलं, पाहा प्रोमो

जान्हवीबद्दल योगिता काय म्हणाली?

घरात मानसिक आरोग्य बिघडवण्यासाठी कोण जास्त जबाबदार आहे असं तुला वाटतं? या प्रश्नावर योगिता ( Yogita Chavan ) म्हणाली, “निक्कीपेक्षा जास्त जान्हवी जबाबदार आहे असं मला वाटतं. खरंतर जान्हवीने मला वैयक्तिकरित्या काहीच त्रास दिलेला नाही. पण, जान्हवीला मी बाहेर याआधी भेटले होते ती आत अशी का वागतेय मला खरंच माहिती नाही. केवळ गेमसाठी ती हे सगळं करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण, तिचं असं वागणं कोणालाही आवडत नाहीये. मी आणि पॅडी दादांनी तिला समजवलं होतं…ती अत्यंत चुकीचे शब्द वापरते. लायकी काढते. कोणताही गेम एवढा महत्त्वाचा नसतो की, आपण एखाद्याला टोकाचं बोलू शकतो. घरात वर्षा ताईंना खूप जास्त टार्गेट करण्यात आलं. पण, त्यांनी गोष्टी खूप संयमाने हाताळल्या याबद्दल त्यांचं खूप कौतुक आहे. खरंतर तेवढा कणखरपणा प्रत्येकामध्ये आला पाहिजे.”

दरम्यान, योगिता चव्हाण ( Yogita Chavan ) ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने अंतरा हे पात्र साकारलं होतं. यानंतर योगिताने खऱ्या आयुष्यात मालिकेतील मल्हार म्हणजेच सौरभ चौघुलेशी लग्न केलं. लग्नाला पाच महिने पूर्ण झाल्यावर अभिनेत्रीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, मानसिक तणाव व घरातील भांडणं सहन न झाल्याने योगिताला आपली जादू या खेळात दाखवता आली नाही.

हेही वाचा : Video : कोल्हापुरी हलगीवर ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे यांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “तोड नाही…”

yogita chavan
Bigg Boss Marathi Yogita Chavan ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

योगिता बेघर झाल्यावर अनेक कलाकार व नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या एविक्शनच्या पोस्टवर काही युजर्सनी योगिता न डगमगता खेळली असती तर नक्कीच जिंकली असं म्हटलं आहे.

Story img Loader