Yogita Chavan Christmas Celebration : ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले हे कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. मालिकेत या दोघांनी अंतरा व मल्हार ही पात्र साकारली होती. जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी अंतरा-मल्हारची ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन सुद्धा एकत्र आली. २०२४ च्या मार्च महिन्यात योगिता व सौरभ या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. यानंतर अभिनेत्री ‘बिग बॉस मराठी’मध्ये सुद्धा सहभागी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

योगिता शोमध्ये असताना सौरभ तिला कायम खंबीरपणे साथ देताना दिसला. ‘बिग बॉस’चा खेळ अभिनेत्रीने मानसिक तणावामुळे सोडण्याचा निर्णय घेतला होता. या संपूर्ण काळात सौरभने तिला खंबीरपणे पाठिंबा दिला. लग्नानंतरचे प्रत्येक सण सौरभ-योगिताने अगदी आपुलकीने साजरे केले. योगिताला नाताळ सण आवडत असल्याने नुकतीच सौरभने लाडक्या बायकोसाठी संपूर्ण घरात सजावट केली होती. ही सजावट पाहून भारावून गेल्याचा व्हिडीओ योगिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला घेऊन…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

योगिताच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना सौरभने सुनावलं

सौरभने घरात केलेल्या सुंदर अशा ख्रिसमस डेकोरेशनचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मात्र, या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी ख्रिसमस साजरा केला म्हणून अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. या नेटकऱ्यांना सौरभने खडेबोल सुनावले आहेत.

एका युजरने योगिताच्या ( Yogita Chavan ) व्हिडीओवर, “हे आहेत आपले मराठी कलाकार, यांच्याकडून शिकावं इंग्रजी उत्सव साजरे करतात” अशी कमेंट केली होती. यावर सौरभ उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार करणे, प्रसार करणे… हे जे काही तुम्ही बोलताय ते सगळं आम्ही नक्की करू किंवा आम्ही करतोच. तुम्ही आमच्या दिवाळीच्या, गणपतीच्या पोस्ट पाहिल्यात तर तुमच्या हे नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही संस्कृती आणि मराठी भाषेबद्दल बोलताय, स्वत: मात्र कमेंट इंग्रजीमध्येच करताय याचा अर्थ तुम्ही मराठीचा प्रसार करत नाही आहात बरोबर?”

दुसऱ्या एका युजरने अभिनेत्रीच्या व्हिडीओवर, “लाज तर आधीच सोडलेली आहे अजून काय अपेक्षा शेम” असं म्हटलं आहे. यावर सौरभ म्हणाला, “तुमचे व्हिडीओ पाहिले आणि ते पाहून असं वाटतंय खरी लाज तुम्ही सोडलीये एकदा नक्की बघा तुमचे व्हिडीओ कसे वाटतात.” याशिवाय अभिनेत्याने आणखी एका युजरला, “आम्ही पाडव्याचे फोटो- व्हिडीओ शेअर केलेत ते सुद्धा बघा” असं उत्तर कमेंट्समध्ये दिलं आहे.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; फोटो शेअर करत म्हणाली…

सौरभ चौघुलेचं नेटकऱ्यांना उत्तर ( Yogita Chavan Christmas Celebration )

दरम्यान, सौरभ – योगिताप्रमाणे ( Yogita Chavan ) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतच्या फोटोंवर देखील अशाचप्रकारची कमेंट करण्यात आली होती. ओंकार राऊतने देखील सौरभप्रमाणे संबंधित युजरला स्पष्ट उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.