मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत स्पृहा जोशी हे नाव कायमच पाहायला मिळतं. उत्तम अभिनेत्री, संवेदनशील कवयित्री आणि उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळखलं जातं. स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. सध्या स्पृहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती करिअर संपलंय असं म्हणताना दिसत आहे.
रविवारी २६ मार्चला ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळा रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत. यंदा या सोहळ्याची थीम ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ अशी आहे. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी तिला एक बातमी सांगितली जाते. “तुला २०२४ साठी महाकवी ही पदवी बहाल केली गेली आहे. तर तुला याबद्दल काय वाटतंय”, असे तिला विचारण्यात आले.
आणखी वाचा : “तुझं माझं नेटवर्क…” ऋतुजा बागवेच्या बोल्ड फोटोवर ओंकार राऊतची कमेंट, अभिनेत्री म्हणाली “सर्व्हर…”
“मला असं वाटलं होतं की कवी म्हणून माझी जरा लांब कारकिर्द असेल. पण २०२४ मध्ये महाकवीची पदवी म्हणजे संपलेच की आता… आता तर वाटतंय की त्यावर्षीच्या ‘झी चित्र गौरव’मध्ये मला जीवन गौरव पुरस्कारही मिळेल कदाचित. महाकवी मिळत असेल तर माझी काही हरकत नाही”, असे स्पृहा जोशीने म्हटले. स्पृहा जोशीचा हा व्हिडीओ मनोरंजनात्मक आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. स्पृहाने आतापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरीज अशा विविध माध्यमात भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सोशल मिडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत त्यांच्या संपर्कात राहते.