मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यासोबत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतंच अशोक सराफ यांना ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. यानिमित्ताने त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा यंदाच्या झी चित्रगौरव सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा गौरव करण्यात येणार आहे. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातील या क्षणाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावेळी अशोक सराफ आणि उपस्थितीत सर्वजण भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : Video : सिद्धार्थ जाधवकडून अशोक सराफ यांना अनोखी मानवंदना; केलं असं काही की सगळ्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू
नुकतंच निवेदिता सराफ यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अभिनेता सिद्धार्थ जाधव, रितेश देशमुख, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, उमेश कामत, श्रेयस तळपदे ही कलाकार मंडळी बसून अशोक सराफ यांना हा पुरस्कार देताना दिसत आहेत.
“मी झी मराठीची खूप ऋणी आहे अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल”, असे कॅप्शन निवेदिता सराफ यांनी या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : “माझा मित्रच कधी सासरा…” अशोक सराफ यांनी सांगितला बायकोच्या वडिलांना पहिल्यांदा भेटल्याचा किस्सा
दरम्यान मालिका, नाटक व चित्रपट अशा सगळ्याच माध्यमात काम करुन अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘साडे माडे तीन’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. मराठीबरोबर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं.