मराठी मनोरंजन विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास उपस्थिती लावली होती. हा भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अवधूत गुप्तेंनी उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.

पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे उत्तरं दिली. या कार्यक्रमात त्यांनी काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला. चित्रपटांच्या आवडीविषयी सांगताना अजित पवार म्हणाले, “मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलेजच्या काळात मला अमिताभ बच्चन आवडायचे, नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड बदलत असते.”

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चा पुन्हा एकदा जलवा! ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव, सुकन्या मोने म्हणाल्या…

अवधूत गुप्तेंनी पुढे, “तुमच्यावर बायोपिक आला, तर कोणत्या अभिनेत्याने भूमिका करावी?” असा प्रश्न अजित पवारांना विचारला. यावर त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’चा सूत्रसंचालक डॉक्टर निलेश साबळेचं नाव घेतलं. यानंतर निलेशने अजित पवारांची मिमिक्री देखील करून दाखवली.

हेही वाचा : Oscars 2024 : भारतीय सिनेप्रेमींना लाइव्ह पाहता येणार ऑस्कर सोहळा! कधी व कुठे जाणून घ्या…

दरम्यान, ‘झी चित्र गौरव २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण ‘झी मराठी’ वाहिनीवर शनिवार १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर करण्यात येणार आहे. यंदा या कार्यक्रमाला सारा अली खान आणि शिल्पा शेट्टी या बॉलीवूड अभिनेत्री देखील उपस्थित होत्या.

Story img Loader