मराठी मनोरंजन विश्वातील चित्रपट विभागात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येतो. या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातील विविध मान्यवर खास उपस्थिती लावतात. यंदाच्या वर्षी या सोहळ्याला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सारा अली खान यांनी पारंपरिक लूक करून विशेष हजेरी लावली होती. नुकताच हा समारंभ पार पडला.

चित्र गौरव समारंभ पार पडल्यावर आता प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या आवडत्या कलाकारांना कोणता पुरस्कार मिळाला याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर केलेला एक फोटो चर्चेत आला आहे. यामध्ये दिग्दर्शकाच्या लेकीने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कारावर नाव कोरल्याचं पाहायला मिळत आहे.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा

हेही वाचा : ना आलिया, ना दीपिका…; सारा तेंडुलकरला आवडते ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री, सचिनच्या लेकीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

केदार शिंदे यांची लेक सनाने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. हा चित्रपट शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये सनाने शाहिरांची पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं.

हेही वाचा : “मी कोणाच्याही लग्नात नाचले नाही”, कंगना रणौतची ‘ती’ पोस्ट चर्चेत; लता मंगेशकरांचा उल्लेख करत म्हणाली…

kedar shinde
केदार शिंदे यांची इन्स्टाग्राम स्टोरी

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सनाचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी सन्मान करण्यात आला. अभिनेत्रीला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. लेकीला अवॉर्ड मिळाल्यावर “सना तुझा अभिमान वाटतो” अशी पोस्ट दिग्दर्शक केदार शिंदेंनी शेअर केली आहे. दरम्यान, पुरस्कार जिंकल्यावर सध्या सनावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader