‘झी चित्र गौरव पुरस्कार'( zee chitra gaurav puraskar 2025) सोहळ्याची सध्या मोठी चर्चो सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. २५ व्या वर्षानिमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या कलाकारांची या सोहळ्याला उपस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक सराफ, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, महेश कोठारे, रितेश देशमुख, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, प्राजक्ता माळी, मृण्मयी देशपांडे, श्रेयस तळपदे, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, श्रेया बुगडे अशा अनेक कलाकरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक रील्स, व्हिडीओमधून या कार्यक्रमात काय धमाल होणार हे पाहायला मिळत आहे. डान्स, पुरस्कार, कॉमेडी यांची धमाल रंगणार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी रितेश देशमुख व अमेय वाघ यांनी सांभाळल्याचे दिसत आहे. आता या सगळ्यात श्रेयस तळपदेने त्याला पहिला पुरस्कार कधी मिळाला होता, याची आठवण सांगितली आहे.

श्रेयस तळपदे त्याच्या पत्नीसह झी चित्र गौरव २०२५ साठी उपस्थित राहिला. त्यावेळी त्याने ‘टेलिगप्पा’ या यूट्यूब चॅनेलशी संवाद साधला. झी चित्र गौरव पुरस्कर सोहळ्याबद्दल बोलताना त्याने म्हटले, “या निमित्ताने सगळे मित्र भेटतात. वरिष्ठ, दिग्गज असे सगळेच कलाकार भेटतात. झीची खासियत ही आहे की, पहिल्यापासूनच घरचा सोहळा वाटतो, त्यामुळे इथे यायला छान वाटतं. जेव्हा तुम्ही त्याचा भाग असता, त्याचा उत्साह जास्त असतो.”

श्रेयसला त्याच्या पहिल्या पुरस्काराविषयी विचारण्यात आले. यावेळी बोलताना अभिनेत्याने म्हटले, “राज्य सरकारचा पहिला पुरस्कार मिळाला होता, ‘रेशीमगाठ’ नावाचा चित्रपट होता. ‘रेशीमगाठ’ हा शब्द माझ्यासाठी शुभ ठरलेला आहे, तर मला आठवतं की चीची भैय्या म्हणजे गोविंदा सर आणि शाहरुख खान यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला होता. मला खूप आनंद झाला होता. ती ट्रॉफी खूप जड होती. प्रत्येक पुरस्कार हा पाठीवर थाप असते आणि ती नेहमीच लक्षात राहते”, असे म्हणत पहिल्या पुरस्कराची श्रेयसने आठवण सांगितली आहे.

श्रेयसला त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल विचारले असता त्याने म्हटले, “‘हाऊसफुल ५’, ‘बागी ४’, ‘द इंडिया स्टोरी’ आणि अजून एक दोन फिल्म्स आहेत. नुकताच ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पुढे ‘पुष्पा २’साठी श्रेयस तळपदेचे कौतुक होताना दिसते. हे पाहिल्यानंतर दिप्तीच्या काय भावना आहेत, असे विचारले. यावर बोलताना श्रेयसच्या पत्नीने दिप्तीने म्हटले, “खूप छान वाटतं. अभिमान वाटतो. हे सगळं बघून कधी कधी भरून येतं, मला छान वाटतं”, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेता श्रेयस तळपदेने पुष्पा चित्रपटातील पुष्पा या भूमिकेला आवाज दिला आहे, आता त्याच्या नवीन चित्रपटातून तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे,

Story img Loader