‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेल्यावर्षी १३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊतने केली आहे. अक्षरा-अधिपतीच्या प्रेमकहाणीला अवघ्या थोड्याच दिवसांत प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता अभिनेत्रीची निर्मिती असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही नवीन मालिका आजपासून ( १८ मार्च ) प्रसारित करण्यात येणार आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शर्मिष्ठा राऊतची निर्मितीसंस्था एक पाऊल पुढे टाकत प्रेक्षकांसाठी आणखी एक मालिका प्रदर्शित करणार आहे. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणते, नमस्कार! आज तुम्ही ‘नवरी मिळे हिटलरला’ या ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेच्या सेटवर आला आहात. बरोबर गेल्यावर्षी १३ मार्चला आपण ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची सुरुवात केली होती. तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि अजूनही तो मिळतोय. आता निर्माते म्हणून मी आणि तेजस ‘झी मराठी’वर नवीन मालिका घेऊन येतोय.”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील सायलीला पाहिलंत का? पुरस्कार जिंकल्यावर बायकोसाठी केली खास पोस्ट

शर्मिष्ठा पुढे म्हणाली, “या मालिकेचं नाव आहे ‘नवरी मिळे हिटलरला’. शूटिंग सुरू होण्यापूर्वी आपण बाहेर ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आपण आपल्या मंगलमय दिवसाची सुरुवात केली आहे. नव्या मालिकेची सुरुवात असल्याने आज इथे खास पूजा करण्यात आली. मी स्वामीभक्त असल्याने खास स्वामींचा अभिषेक करण्यात आला.”

हेही वाचा : अखेर १० वर्षांनी ‘चला हवा येऊ द्या’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप, कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकहो…”

“तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर या प्रवासात सदैव पाठिशी राहा. तुमची साथ खूप खूप मोलाची आहे. तुमच्याशिवाय मी हे यशाचं शिखर गाठू शकत नाही.” असं अभिनेत्रीने सांगितलं. दरम्यान, हिंदी कलाविश्वात नावाजलेला अभिनेता राकेश बापट या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार असल्याचं नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे. याशिवाय राकेशसह ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत वल्लारी विराज प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Story img Loader