Zee Marathi Celebration Daddy & Bai Aaji Dance Video : ‘झी मराठी’ वाहिनीवर मकार संक्रातीनिमित्त यंदा विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या भागासाठी वाहिनीचे सगळे कलाकार एकत्र येणार आहेत. हा गोड नात्यांचा उत्सव साजरा करताना अनेक कलाकार विविध गाण्यांवर थिरकताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वाहिनीने या ‘मकर संक्रांत विशेष’ भागाची झलक नुकतीच अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये डॅडी आणि बाई आजीचा जबरदस्त डान्स सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील डॅडी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि ‘शिवा’ मालिकेत बाई आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर या दोघांनी मिळून ‘मकर संक्रांत विशेष’ भागात ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी दोघांनी पुष्पा आणि श्रीवल्लीसारखा लूक केला होता.

हेही वाचा : ३ भावंडांची जुगलबंदी, कुटुंबातील प्रेम, मतभेद अन्…; ‘फसक्लास दाभाडे’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार ट्रेलर प्रदर्शित

डॅडी अन् बाई आजीचा हुबेहूब पुष्पा-श्रीवल्ली लूक

डॅडींनी या सोहळ्यात डान्स करताना, फ्लॉवर प्रिंट असलेला निळ्या रंगाचा रंगीबेरंगी शर्ट, गळ्यात सोन्याची चैन, हातात अंगठ्या, उजव्या हातात माळ आणि डोळ्याला गॉगल लावून डॅशिंग लूक केला होता. तर, सविता मालपेकरांनी श्रीवल्लीसारखी दाक्षिणात्य साडी नेसून मोकळ्या केसात गजरा, अंगावर भरजरी दागिने घातल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Bigg Boss 18: २१ लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने चाहत पांडेच्या बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा, फोटो शेअर करत म्हणाला…

डॅडी व बाई आजी यांचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या गाण्यावर डान्स ( Zee Marathi Celebration Daddy & Bai Aaji Dance Video )

हेही वाचा : जान्हवी किल्लेकर पोहोचली नलिनी काकूंच्या घरी! चुलीवर बनवलं ‘Banana Leaf पापलेट’, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले…

डॅडी आणि बाई आजीने मिळून या सोहळ्यात ‘पुष्पा २’च्या सुसेकी गाण्यावर ठेका धरल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून हे ‘अंगारो सा’ गाणं सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे. आजवर बहुतांश सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकले आहेत. डॅडी आणि बाई आजीने या गाण्यावर ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत जबरदस्त डान्स केला आहे. दोघांची या वयातली केमिस्ट्री, फिल्मी डायलॉग, सोहळ्यातील हटके लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, हा ‘मकर संक्रात’ विशेष सोहळा येत्या १२ जानेवारीला म्हणजेच रविवारी सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ ( Zee Marathi ) वाहिनीवर प्रसारित केला जाईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi actors daddy aka girish oak and bai aaji aka savita malpekar dance on pushpa 2 song sva 00