Zee Marathi New Serial Icchadhari Nagin : सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरात ‘झी मराठी’ वाहिनीवर अनेक सकारात्मक बदल होऊन, सध्या वाहिनी चांगल्या टीआरपी आकडेवारीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महिन्याभरापूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांचं २५ वं वर्ष साजरं केलं. यादिवशी ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचं ग्रँड लाँचिंग करण्यात आलं. या पाठोपाठ ‘तुला जपणार आहे’ या मालिकेची लहानशी झलक सुद्धा या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या दोन मालिका अद्याप ऑन एअर झालेल्या नाहीत. अशातच वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लक्ष्मी निवास’, ‘तुला जपणार आहे’ या मालिकांपाठोपाठ आता आणखी एक नवीन थ्रिलर मालिका ( Zee Marathi ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘इच्छाधारी नागीण’. वाहिनीने नुकतीच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.

हेही वाचा : ८ वर्षांच्या अफेअरनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

प्रोमोच्या सुरुवातीला एका मोठा शंखनाद ऐकायला मिळतो. पहिलीच झलक पाहून ही मालिका ( Zee Marathi ) थ्रिलर असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप याची तारीख, वेळ, कलाकार याची कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. अंधारी रात्र, खळखळ वाहणारं पाणी, त्यातून बाहेर येणारे दोन नाग ही दृश्य सर्वांचं लक्ष वेधून घेतात. या VFX चं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये सुद्धा कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “अंगारो सा…”, अल्लू अर्जुन अन् रश्मिकाचा ‘सुसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स! पुष्पा-श्रीवल्लीची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले…

हेही वाचा : Video : रेश्मा शिंदेने घेतला हिंदी उखाणा! ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने लग्नात केली धमाल, नवरा-नवरीच्या दाक्षिणात्य लूकने वेधलं लक्ष

दरम्यान, टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सध्या प्रत्येक मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ‘इच्छाधारी नागीण’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘इच्छाधारी नागीण’ ही रहस्यमय आणि थ्रिलर मालिका असणार आहे. आता नव्या मालिकेची ( Zee Marathi ) तारीख अन् वेळ जाहीर झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबाबत स्पष्टता येईल.