‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काळात अनेक नव्या मालिका आणि रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या लोकप्रिय मालिकांनी निरोप घेतला. पण आता लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘पारू’, ‘शिवा’नंतर आणखी एका नव्या मालिकेची घोषणा झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांपूर्वीच ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिकांचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला होता. या प्रोमोमधून दोन नवा मालिकांच्या नायिकांची ओळख करून देण्यात आली होती. अभिनेत्री शरयू सोनावणे ही पारूच्या भूमिकेतून तर अभिनेत्री पूर्वा फडके शिवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण याच्यासह आणखी एक मालिका ‘झी मराठी’वर सुरू होणार आहे.

हेही वाचा – निरोप घेतल्यानंतरही ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेची क्रेझ कायम! अभिनेत्रीने शेअर केला चिमुकल्या चाहत्यांचा व्हिडीओ

‘जगद्धात्री’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पेजवर या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘बाई घर चालवू शकते आणि वेळ पडली तर देशाचं रक्षण सुद्धा करू शकते. दोन्ही जबाबदाऱ्या लिलया पेलणारी, जगद्धात्री लवकरच’, असं या प्रोमोमधून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘जगद्धात्री’ ही नवी मालिका बंगाली मालिकेचा रिमेक आहे. ‘झी बांगला’वरील ब्लॉकबस्टर मालिका ‘जगद्धात्री’ या मालिकेचा हा रिमेक आहे. शिवाय ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन्ही मालिका देखील रिमेक आहेत. ‘पारू’ तेलुगू मालिका ‘मुद्धा मंदारम’चा रिमेक आहे. तर ‘शिवा’ ओडिया मालिका ‘सिंदूरा बिंदी’चा रिमेक आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi announces new serial jagadhatri promo out pps