छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर, ‘झी मराठी’ वाहिनीचा टीआरपी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत काहीसा घसरल्याचं चित्र निर्माण झालं आहे. रंजक मालिकांची निर्मिती करून प्रेक्षकांना पुन्हा एकदा आकर्षित करण्यासाठी ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने ‘पारू’ आणि ‘शिवा’ या नव्या मालिकांची घोषणा केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या मालिका सुरू झाल्याने काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. यापूर्वी ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तसेच येत्या काही दिवसात दीपा परब-चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तू चालं पुढं’ मालिकेचा अखेरचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १३ जानेवारीला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल.

हेही वाचा : “दोघांच्या लग्नाला आमचा पाठिंबा नव्हता”, अंकिता लोखंडेच्या सासूबाईंनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या, “त्यांच्यातील भांडणं…”

‘तू चालं पुढं’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते. त्यामुळे १३ जानेवारीला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर १५ जानेवारीपासून वाहिनीवर एक महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका प्रेक्षकांना आता नव्या वेळेत पाहता येणार आहे. सध्या ही मालिका सायंकाळी साडेवाजता प्रक्षेपित केली जाते. परंतु, १५ जानेवारीपासून ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांना संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.

हेही वाचा : “३१ डिसेंबरला असं काय खास असतं?” गोव्यातील तुफान गर्दी पाहून शशांक केतकरचा सवाल; म्हणाला…

दरम्यान, नेटकऱ्यांनी लोकप्रिय मालिकांच्या सतत वेळ बदलण्याच्या वाहिनीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. “‘झी मराठी’ मालिकांच्या वेळांमध्ये किती वेळा बदल करणार?”, “सध्या झी मराठीवर फक्त ४ मालिका उरल्या आहेत असं पहिल्यांदाच घडत असेल.”, “काय खरं नाही झी मराठीचं” अशा कमेंट्स युजर्सनी या पोस्टवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi appi amchi collector serial time has changes and tu chal pudha serial will go off air from 13th january sva 00