Zee Marathi Award Winner 2023 : झी मराठी वाहिनी दरवर्षी मालिका विभाग, चित्र आणि नाट्य विभाग अशा विविध पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवार्ड्स’ सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा, माधुरी दीक्षित यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. प्रेक्षकांनी भरघोस मतं देऊन विजयी केलेल्या कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येतो.
यंदा ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्यासाठी’, ‘तू चाल पुढं’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘३६ गुणी जोडी’ या मालिका आणि कलाकारांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती.
पुरस्कार सोहळा पार पडला की, प्रेक्षकांच्या मनात कोणत्या कलाकाराला कोणता पुरस्कार मिळाला असेल याबद्दल उत्सुकता निर्माण होते. पुरस्कार सोहळ्याचं प्रेक्षपण ४ नोव्हेंबरला करण्यात येणार असलं तरीही, या सोहळ्यातील काही खास क्षण अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘झी मराठी अवार्ड्स’मध्ये यंदा सर्वोत्कृष्ट सासू या विभागात भुवनेश्वरी (तुला शिकवीन चांगलाच धडा), रुपाली ( सातव्या मुलीची सातवी मुलगी), रुक्मिणी (अप्पी आमची कलेक्टर), उज्ज्वला (तू चाल पुढं), सुलक्षणा (नवा गडी नवं राज्य), दाईची खोत (सारं काही तिच्यासाठी) या अभिनेत्रींना नामांकन मिळालं होतं.
हेही वाचा : ‘या’ गोड चिमुकलीला ओळखलंत का? रातोरात झाली होती सुपरस्टार
नामांकन मिळालेल्या ६ जणींपैकी कोण बाजी मारणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. शेवटी यात ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत सुलक्षणाची भूमिका साकारणाऱ्या वर्षा दांदळेंनी बाजी मारली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यांनी ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. “बक्षीस मिळालं तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, सध्या अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.