‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. या वाहिनीवरील विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा या सोहळ्यात सन्मान केला जातो. यंदा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सारं काही तिच्यासाठी’, ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. अखेर सर्वोत्कृष्ट मालिका २०२३ या पुरस्कारावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने नाव कोरलं.
हेही वाचा : ZMA 2023 : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ मालिकेने मारली बाजी! सर्वोत्कृष्ट जोडी, नायक-नायिका आहेत…
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या दोघांचा शाही विवाहसोहळा गेल्या महिन्यात थाटामाटात पार पडला होता. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अक्षरा हे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळेने साकारलं आहे.
शिवानी रांगोळेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर तिने मे २०२२ रोजी तिने अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिच्या आणि सासूबाई मृणाल कुलकर्णींच्या बॉण्डिंगची विशेष चर्चा होते. ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सुनेला पुरस्कार मिळाल्या मृणाल कुलकर्णी प्रचंड आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : हार्दिक जोशीचं ‘झी मराठी’वर पुन्हा कमबॅक! राणादा लवकरच घेऊन येणार नवीन रिअॅलिटी शो, जाणून घ्या…
अभिनेत्री शिवानी रांगोळेला यंदाच्या विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यावर मृणाल कुलकर्णींनी लगेच फोन काढून तिचा पुरस्कार स्वीकारताना फोटो काढला. त्या फोटो काढत असल्याचं अधिपतीने सर्वांसमोर सांगितलं. “तिच्या खऱ्या सासूबाईंना पाहा किती आनंद झालाय” असं अधिपती सांगत होता. यावरून उपस्थितांनी सासू-सुनेच्या या गोड नात्याचं कौतुक केलं. दरम्यान, झी मराठी पुरस्कार सोहळ्यात शिवानीला एकूण ३ पुरस्कार मिळाले आहेत.