Zee Marathi Awards Winner List 2023 : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याची गेले कित्येक दिवस चर्चा सुरू आहे. यंदा ‘झी मराठी’ वाहिनीला २४ वर्ष पूर्ण झालेली आहेत. यानिमित्ताने आज पार पडलेल्या सोहळ्याला बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मलायका अरोरा यांनी हजेरी लावली होती. यंदाच्या सोहळ्यात कोण बाजी मारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावं आता समोर आलेली आहेत.

‘झी मराठी’ पुरस्कार’ सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘तू चाल पुढं’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सर्वोत्कृष्ट नायक-नायिका, जोडी, मालिका, सर्वोत्कृष्ट कुटुंब हे महत्त्वाचे पुरस्कार कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष होतं. हे महत्त्वाचे पुरस्कार कोणी जिंकलेत जाणून घेऊयात…

Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
zee marathi awards part 1 winner list navri mile hitlerla fame actress vallari got 3 awards
Zee Marathi Awards 2024 : सर्वोत्कृष्ट सासू अन् सून ठरली ‘ही’ एकच अभिनेत्री! तर, सर्वोत्कृष्ट मुलगा ठरला…
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत.

पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

१. सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत – तू चाल पुढं
२. सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा स्त्री – मयुरी (तू चाल पुढं)
३. सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा पुरुष – भालबा (सातव्या मुलीची सातवी मुलगी)
४. सर्वोत्कृष्ट भावंडं – ओवी-निशी ( सारं काही तिच्यासाठी)
५. सर्वोत्कृष्ट विनोदी स्त्री – फाल्गुनी (सातव्या मुलीची सातवी मुलगी)
६. सर्वोत्कृष्ट विनोदी पुरुष – फुलपगारे सर ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
७. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
८. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – रघुनाथ (सारं काही तिच्यासाठी)
९. सर्वोत्कृष्ट आजी – अधिपतीची आजी ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
१०. सर्वोत्कृष्ट आजोबा – पाटकर ( नवा गडी नवं राज्य )
११. सर्वोत्कृष्ट मैत्री – नेत्रा-फाल्गुनी ( सातव्या मुलीची सातवी मुलगी)
१२. सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी (तुला शिकवीन चांगलाच धडा )
१३. सर्वोत्कृष्ट खलनायक – संकल्प (अप्पी आमची कलेक्टर)
१४. सर्वोत्कृष्ट सासू – सुलक्षणा ( नवा गडी नवं राज्य )
१५. सर्वोत्कृष्ट सासरे – प्रकाश ( तू चाल पुढं )
१६. सर्वोत्कृष्ट सून – उमा ( सारं काही तिच्यासाठी )
१७. सर्वोत्कृष्ट जावई – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
१८. विशेष लक्षवेधी चेहरा – अक्षरा ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
१९. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक – मृण्मयी देशपांडे ( सारेगमप)
२०. सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – चला हवा येऊ द्या
२१. सर्वोत्कृष्ट आई – उमा (सारं काही तिच्यासाठी)
२२. सर्वोत्कृष्ट वडील – रघुनाथ ( सारं काही तिच्यासाठी )
२३. सर्वोत्कृष्ट बालकलाकार – चिंगी (नवा गडी नवं राज्य)
२४. सर्वोत्कृष्ट जोडी – अक्षरा-अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
२५. सर्वोत्कृष्ट नायिका – अक्षरा (तुला शिकवीन चांगलाच धडा)
२६. सर्वोत्कृष्ट नायक – अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
२७. सर्वोत्कृष्ट कुटुंब – खोत कुटुंब (सारं काही तिच्यासाठी )
२८. सर्वोत्कृष्ट मालिका – तुला शिकवीन चांगलाच धडा

विशेष योगदान
१. महेंद्र कदम (दिग्दर्शक)
२. प्रल्हाद कुडतरकर (लेखक)
३. रोशन परब ( प्रोडक्शन हेड )