Zee Marathi Awards 2024 Akshara and Adhipati dance : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचा पहिला भाग शनिवारी ( २६ ऑक्टोबर ) मोठ्या दणक्यात पार पडला. यंदा वाहिनीला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं. या सोहळ्यात ‘झी मराठी’वर सध्या सुरू असलेल्या मालिकांमधील लोकप्रिय जोड्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स सादर केले. यात अक्षरा-अधिपतीच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
अक्षरा आणि अधिपतीच्या भूमिका अनुक्रमे अभिनेत्री शिवानी रांगोळे व हृषिकेश शेलार यांनी साकारल्या आहेत. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या कथानकानुसार अधिपती आपल्या आईचं आणि लग्न झाल्यापासून पत्नीच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. सध्या भुवनेश्वरी घरात नसल्याने अधिपती काहीसा अस्वस्थ असल्याचा सीक्वेन्स मालिकेत सुरू आहे. मात्र, या दोघांच्या जोडीने पुरस्कार ( Zee Marathi Awards ) सोहळ्यात तेवढीच धमाल उडवून दिली.
हेही वाचा : Salman Khan – संतप्त बिश्नोई समाजाने सलमान आणि त्याच्या वडिलांचा पुतळा जाळला; सलीम खान यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भावना दुखावल्या…
‘जोरु का गुलाम’ गाण्यावर अक्षरा-अधिपतीचा डान्स
गोविंदा आणि ट्विंकल खन्ना यांच्या प्रमुख असलेला ‘जोरु का गुलाम’ चित्रपट २००० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील “मैं जोरू का गुलाम बनके रहूंगा…” हे गाणं सर्वत्र सुपरहिट ठरलं होतं. अगदी आजही हे गाणं प्रत्येक लग्नसमारंभात वाजवलं जातं. याच लोकप्रिय गाण्यावर अक्षरा-अधिपती ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात थिरकले. या दोघांनी जांभळ्या रंगाचे मॅचिंग असे कपडे घातले होते. दोघांच्या एनर्जीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
अक्षरा-अधिपतीच्या डान्सवर नेटकऱ्यांसह त्यांच्या तमाम चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अधिक्षरा नादखुळा…दोघे सुंदर दिसत आहेत एकमेकांबरोबर…”, “अधिक्षरा म्हणजे प्रेम”, “एकदम लयभारी”, “अधिपती-अक्षरा लव्हली कपल”, “जबरदस्त परफॉर्मन्स”, “विषय हार्ड एक नंबर अधिक्षरा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या दोघांचा डान्स पाहून दिल्या आहेत.
हेही वाचा : Zee Marathi Awards – वांद्रे रेक्लेमेशनजवळ बसलेले प्रिया-उमेश; दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात छापून आलेला फोटो, २५ वर्षांपूर्वीचा किस्सा ऐकून पिकला एकच हशा
दरम्यान, हा डान्स पार पडल्यावर अधिपती व अक्षराने दोघांनी सोहळ्यादरम्यान एकमेकांना प्रपोज देखील केलं. यावेळी अक्षराला अधिपतीच्या रांगड्या कोल्हापुरी भाषेत आणि अधिपतीला मास्तरीणबाईंसारखी शुद्ध मराठी भाषा बोलण्याचा टास्क ( Zee Marathi Awards ) देण्यात आला होता. दोघांच्या केमिस्ट्रीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.