Zee Marathi Awards 2024 Winners : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला. यंदा या सोहळ्याचं २५ वं वर्ष असल्याने मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा करण्यात आला. जुन्या तसेच वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या मालिकांचा या शोमध्ये सन्मान करण्यात आला. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका यंदाची लोकप्रिय मालिका ठरली. यामध्ये राकेश बापट आणि वल्लरी विराज या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने यंदा बऱ्याच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. यामुळे या मालिकेची निर्माती अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत प्रचंड आनंदी झाली आहे. याचं मूळ कारण म्हणजे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर शर्मिष्ठा व तिचे पती तेजस देसाई यांनी निर्मिती केलेल्या दोन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. एक म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि दुसरी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. या दोन्ही मालिकांना आताच्या घडीला चांगला टीआरपी मिळत आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाची पोचपावती म्हणून सलग दोन वर्ष अभिनेत्रीच्या दोन्ही मालिकांना महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.

Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”

हेही वाचा : साध्या पद्धतीने लग्नसोहळा पार पडल्यावर पृथ्वीक प्रताप पत्नीसह पोहोचला देवदर्शनाला, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

शर्मिष्ठाने पुरस्कार सोहळा ( Zee Marathi Awards ) संपताच नवऱ्याबरोबर जिंकलेली ट्रॉफी हातात घेऊन सुंदर असा फोटो काढला आहे. यामध्ये अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. तर, तिचे पती तेजस देसाईंनी त्याच शेडचा कुर्ता घातला आहे. या दोघांच्या बॅकग्राऊंडला झी मराठीची २५ वर्षे असं लिहिलेलं आहे तर, हातात सन्मान केलेले पुरस्कार…हा सुंदर फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

शर्मिष्ठा लिहिते, “झी मराठी पुरस्कार सोहळ्याचं हे सलग दुसरं वर्ष. मागच्या वर्षी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि यावर्षी लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ ठरली. संपूर्ण टीमचे आणि खूप झी मराठी वाहिनीचे खूप खूप आभार”

हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस देशमुख पोहोचले इंडोनेशियात! जिनिलीयाने दाखवली बालीमधल्या निसर्गरम्य वातावरणाची झलक, पाहा फोटो…

हेही वाचा : Video : अनाथ व निराधार वृद्धांसाठी मदतीचा हात…; ‘ठरलं तर मग’ जुई गडकरीच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

Zee Marathi Awards
लोकप्रिय मालिका ( Zee Marathi Awards )

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतच्या ( Zee Marathi Awards ) या पोस्टवर स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, सुकन्या मोने, केतकी पालव या कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader