Zee Marathi Awards : ‘झी मराठी’ वाहिनी गेली कित्येक वर्ष मालिका विश्वातील कलाकारांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवार्ड्स’ सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा, माधुरी दीक्षित यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. प्रेक्षकांनी भरघोस मतं देऊन विजयी केलेल्या कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येतो.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीने मोहम्मद शमीला घातली थेट लग्नाची मागणी! पण असणार ‘ही’ एकच अट, म्हणाली…

यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने बाजी मारली होती. सर्वोत्कृष्ट नायक, नायिका, मालिका, जोडी, खलनायिका असे सगळे महत्त्वाचे पुरस्कार या मालिकेने जिंकले. परंतु, झी मराठीने भुवनेश्वरी या पात्राला खलनायिकेचा पुरस्कार दिल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री कविता मेढेकर यांनी भुवनेश्वरी हे पात्र साकारलं आहे. त्यांचा सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा आणि सर्वोत्कृष्ट खलनायिका अशा दोन पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. मात्र, नेटकऱ्यांच्या मते सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार रुपालीची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांना देणं अपेक्षित होतं. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली ही भूमिका साकारत आहे.

हेही वाचा : Koffee With Karan 8 : सारा अली खान आणि अनन्या पांडेने ‘या’ एकाच अभिनेत्याला केलंय डेट, करण जोहरने केली पोलखोल

zee marathi awards
झी मराठी अवार्ड्सवर प्रेक्षक झाले नाराज

‘झी मराठी’ने शेअर केलेल्या पुरस्कार सोहळ्यातील फोटोंवर कमेंट करत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “हा पुरस्कार रुपालीला मिळायला हवा होता”, “रुपाली हे पात्र ऐश्वर्या नारकरांनी उत्तम साकारलं आहे”, “रुपालीला निदान विभागून तरी पुरस्कार द्यायला पाहिजे होता”, “झी मराठीने पक्षपात केला” अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी या पोस्टवर केल्या आहेत.

Story img Loader