Zee Marathi Awards 2024 Winners Part 1 : छोट्या पडद्यावर दरवर्षी दिवाळी दरम्यान ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचं आयोजन केलं जातं. वाहिनीवरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय कलाकारांचा या सोहळ्यामध्ये प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर सन्मान केला जातो. यंदा या सोहळ्याचं २५ वं वर्ष आहे. त्यामुळे हा सोहळा आज ( २६ ऑक्टोबर ) आणि उद्या ( २७ ऑक्टोबर ) असा दोन दिवस प्रक्षेपित केला जाणार आहे.

आजचा भाग विनोदी कलाकारांचा हटके डान्स, अक्षरा – अधिपतीचं रोमँटिक प्रपोजल, ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेचा प्रोमो लाँच आणि लेखक-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना देण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार या सगळ्यामुळे विशेष लक्षवेधी ठरला आहे.

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याचा पहिला भाग नुकताच पार पडला. यंदा पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर पहिल्या भागाच्या विजेत्यांची यादी आता समोर आली आहे.

हेही वाचा : Zee Marathi Awards : झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! हर्षदा खानविलकर अन् तुषार दळवी प्रमुख भूमिकेत, पाहा पहिला प्रोमो

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – १ विजेते…

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – दुर्गा ( नवरी मिळे हिटलरला )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष – प्रितम ( पारू )

सर्वोत्कृष्ट मैत्री – शिवा, पाना गँग ( शिवा )

सर्वोत्कृष्ट आजी – बाई आजी ( शिवा )

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अमोल, गनी, बनी, चिनू-मनू, बटर

सर्वोत्कृष्ट सासरे – रामभाऊ ( शिवा )

सर्वोत्कृष्ट जावई – ए.जे. ( नवरी मिळे हिटलरला )

झी मराठी रायझिंग स्टार – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )

सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू ( पारू )

सर्वोत्कृष्ट मुलगा – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा )

सर्वोत्कृष्ट सून – लीला ( नवरी मिळे हिटलरला )

सर्वोत्कृष्ट सासू – लीला ( नवरी मिळे हिटलरला )

विशेष लक्षवेधी चेहरा – लीला ( नवरी मिळे हिटलरला )

‘झी मराठी’ जीवनगौरव पुरस्कार – श्रीरंग गोडबोले

सर्वोत्कृष्ट शायनिंग पुरस्कार – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )

Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा पुरुष – आशू ( शिवा )

Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा स्त्री – पारू ( शिवा )

Zee 5 लोकप्रिय मालिका – शिवा

विशेष योगदान पुरस्कार – संदीप रसाळ

Zee Marathi Awards 2024
सर्वोत्कृष्ट सून ( Zee Marathi Awards 2024 )

दरम्यान, आता उर्वरित पुरस्कार उद्याच्या ( २७ ऑक्टोबर ) भागात घोषित केले जाणार आहेत. आता सर्वोत्कृष्ट नायिका, नायक आणि मालिका अशा महत्त्वाच्या पुरस्कारांवर ( Zee Marathi ) कोण नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.