Priya Bapat Zee Marathi Awards 2024 : मराठी नाटक, मालिका, वेबसीरिज, चित्रपट अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. अगदी लहान वयातच तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं. ‘दे धमाल’ या मालिकेमुळे प्रिया घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर प्रियाने ‘आभाळमाया’, ‘शुभं करोती’, ‘दामिनी’, ‘गूड मॉर्निंग महाराष्ट्र’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं. नुकतीच प्रियाने ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला पती उमेश कामतसह उपस्थिती लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियाचा ( Priya Bapat ) चाहतावर्ग आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात आहे. ती दमदार अभिनेत्री तर आहेच पण, प्रिया एक उत्तम गायिका सुद्धा आहे. यापूर्वी प्रियाच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनेकदा अनुभवली आहे. उमेश सुद्धा बऱ्याच वेळा प्रिया गाणी गातानाचे व्हिडीओ शेअर करत असतो. आता पुन्हा एकदा ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर प्रेक्षकांना प्रियाचा सुरेल आवाज ऐकण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : “वस्तू मिळतात अन्…”, अक्षयाने साड्यांच्या दुकानात लावली हटके ‘पुणेरी पाटी’! पाठकबाईंनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

Zee Marathi Awards : प्रिया बापटने गायलं मालिकेचं शीर्षक गीत

‘झी मराठी’ ( Zee Marathi Awards ) वाहिनी यंदा आपलं २५ वं वर्ष साजरं करत आहे. त्यामुळे सगळे जुन्या मालिकेतील कलाकार यंदाच्या सोहळ्याला उपस्थित होते. ‘आभाळमाया’ ही गाजलेली मालिका १९९९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या जुन्या मालिकेच्या आठवणीने आजही प्रेक्षक भावुक होतात. याशिवाय याच मालिकेच्या सेटवर प्रिया-उमेशची पहिली भेट झाली होती. त्यामुळे या मालिकेचं शीर्षक गीत अभिनेत्रीने या पुरस्कार सोहळ्यात सादर केलं आहे.

प्रियाने शीर्षक गीत गायला सुरुवात केल्यावर उपस्थित सगळे कलाकार व प्रेक्षक जुन्या आठवणींमध्ये भावुक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. “प्रियाच्या आवाजात आठवणीतले सूर” असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ने प्रियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “काळवीटाची शिकार करणारा मी नव्हतोच”, सलमान खानने केलेलं वक्तव्य; दुसऱ्याचा आरोप स्वतःवर घेतला? पाहा त्याची प्रतिक्रिया

दरम्यान, प्रिया बापटच्या या व्हिडीओवर ( Zee Marathi Awards ) नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सुंदर कमाल”, “या सारखे शीर्षक गीत होणे नाही… खूप खूप सुंदर गीत आहे”, “खूपच छान…” अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi awards priya bapat sings abhalmaya serial song watch video softnews sva 00