छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ सुरू असते. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक मालिका सुरू होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. या दोन्ही मालिका येत्या १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री पूर्वा फडके व अभिनेता शाल्व किंजवडेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेली ‘पारु’ मालिका संध्याकाळी ७.३०च्या ठोक्याला प्रसारित केली जाणार आहे.

हेही वाचा : “अहो! हा पुरस्कार…”, जिनिलीयाचं मराठी ऐकून भर कार्यक्रमात रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या! अभिनेत्री म्हणते…

सध्या सायंकाळी साडेसात वाजता खुशबू तावडेची प्रमुख भूमिका असलेली ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. परंतु, नव्या मालिकेमुळे वाहिनीने १२ फेब्रुवारीपासून या मालिकेची वेळ बदलून सोम ते शनिवार रात्री ८.३० अशी केली आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘जाऊ बाई गावात’नंतर राणादा दिसणार नव्या भूमिकेत! ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत हार्दिक जोशी पुन्हा घेणार एन्ट्री!

‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांव्यतिरिक्त लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका सुरू होणार आहेत. लवकरच ‘झी मराठी’कडून या मालिकांच्या प्रक्षेपणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे. या नव्या मालिकांमुळे वाहिनीच्या टीआरपीत काय बदल होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत, अशोक शिंदे यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi change time slot of sara kahi tichyasathi serial for new serial paru sva 00