अलीकडच्या काळात ओटीटी माध्यमांना प्रेक्षकांची पसंती मिळत असली, तरी आजही टेलिव्हिजन पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’वर लवकरच ‘जाऊ बाई गावात’ हा नवा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा म्हणजेच हार्दिक जोशीने पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर कमबॅक केलं आहे.

‘जाऊ बाई गावात’ हा नवा कार्यक्रम आणि टीआरपीमध्ये सातत्य राखण्यासाठी आता ‘झी मराठी’ वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन मालिका आणि एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी टीआरपीच्या कारणास्तव ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. परंतु, आता लवकरच हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर येत्या ४ डिसेंबरपासून महत्त्वाचे मोठे बदल करण्यात येणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना ४ तारखेपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० या वेळेत पाहता येणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’प्रमाणे ‘झी मराठी’वरील दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा : आता महाराष्ट्र खळखळून हसणार! ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका ४ डिसेंबरपासून दुपारी २ वाजता, तर ‘३६ गुणी जोडी’ ही लोकप्रिय मालिका दुपारी २.३० वाजता प्रसारित करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. याशिवाय नव्याने सुरू होणारा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री ९.३० च्या वेळेत प्रसारित केला जाणार आहे.

हेही वाचा : पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा! अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमकं काय काम करतो? जाणून घ्या

zee marathi
झी मराठी वाहिनीने मालिकांच्या वेळेत केला बदल

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवरील अनेक मालिकांच्या वेळेत सातत्याने बदल करण्यात येत आहे. याबाबत अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “एवढ्या मोठ्या प्रमाणात मालिकांच्या वेळेत वारंवार बदल करणं एकदम चुकीचं आहे” अशाप्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

Story img Loader