झी मराठी नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन वेगवेगळे कार्यक्रम सादर करून करत आली आहे. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाचे तब्बल १४ भाग प्रदर्शित झाले होते. आता ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा झी मराठी घेऊन येत आहे कॉमेडीचा एक नवीन तडका ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम. या कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत.

आणखी वाचा : ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा हटके टीझर प्रदर्शित, सोनाक्षी आणि हुमाच्या बोल्ड संवादांनी वेधलं लक्ष

तसेच काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत. या कार्यक्रमात हास्याची धमाल उडवून देणारे कलाकार कोण असणार आहेत याचीच चर्चा होताना सध्या दिसत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 4: कुटुंबियांच्या आठवणीत अमृता धोंगडेला अश्रू अनावर, म्हणाली, “इथे सगळेच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फू बाई फू’ या कार्यक्रमामुळे अनेक नवे कलाकार प्रेक्षकांच्या घरातलेच सदस्य होऊन गेले. आज मनोरंजनसृष्टीत अनेक आघाडीचे कलाकार आहेत ज्यांना ‘फू बाई फू’च्या मंचाने पहिली संधी दिली होती. कलाकारांबरोबर यात अनेक सुप्रसिद्ध लेखकांचाही समावेश आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘फू बाई फू’च्या या पर्वात कोणकोणते कलाकार दिसणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ३ नोव्हेंबरपासून गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वा. हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.