छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. संध्याकाळी घरोघरी मालिका पाहिल्या जातात त्यामुळे मराठी वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’वर ४ डिसेंबरपासून ९.३० वाजता ‘जाऊ बाई गावात’ हा नवा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे दोन मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक जोशीने पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर कमबॅक केलं आहे. यापूर्वी त्याने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता या नव्या शोच्या निमित्ताने प्रेक्षकांचा लाडका राणादा सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळणार आहे. या नव्या कार्यक्रमामुळे झी मराठीच्या ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा : “तुम्ही भारतीय रेल्वेत ४० वर्ष…”, ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरचे वडील झाले सेवानिवृत्त! अभिनेत्री म्हणते, “आता…”

‘३६ गुणी जोडी’ या मालिकेची वेळत तिसऱ्यांदा बदल केल्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट सेक्शनमध्ये “रात्री ११ वाजता चांगला टीआरपी मिळत असताना हा एकदम चुकीचं निर्णय घेण्यात आला आहे.” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी काही नेटकऱ्यांनी यावर “कलाकार सुद्धा एवढे कपडे बदलत नाहीत तेवढ्या वेगाने झी मराठी मालिकेच्या वेळा बदलत आहे”, “या लोकांचा वेड्याचा बाजार आहे.”, “फक्त ‘३६ गुणी जोडी’ मालिकेला टारगेट करण्यात येत आहे.” अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : “काय कमाल आहे ना बायकांची?”, ‘झिम्मा २’च्या अभिनेत्रींसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट; म्हणाला, “तुम्ही खरंच…”

‘३६ गुणी जोडी’ ही मालिका २३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका सगळ्यात आधी सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जायची. यानंतर या मालिकेची वेळ बदलून रात्री ११ वाजता करण्यात आली. सध्या आठवडाभर ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येत आहे. दरम्यान, आता ४ डिसेंबरपासून ‘३६ गुणी जोडी’ दुपारी २.३० वाजता दाखवण्यात येईल, तर ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi has changes time slots of 36 guni jodi serial netizens pens angry reactions in comments section sva 00