Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada and Shiva Fame Actors : छोट्या पडद्यावर सध्या दोन मालिकांचे कलाकार एकाच सेटवर येऊन लोकप्रिय मालिकांचा ‘महासंगम’ घडवून आणण्याचा ट्रेंड सुरू आहे. यामुळे प्रेक्षक सुद्धा मालिकेच्या कथेला आकर्षित होतात. यापूर्वी ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील कलाकार एकत्र आले होते. या मालिकांमध्ये ‘पारू’ आणि ‘सावली’ लहानपणापासूनच्या जिवलग मैत्रिणी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. यानंतर नुकताच आणखी दोन मालिकांचा महासंगम ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळाला.
‘लाखात एक आमचा दादा’ आणि ‘शिवा’ या दोन लोकप्रिय मालिकांमधले ( Zee Marathi ) कलाकार काही दिवसांपूर्वीच शूटिंगसाठी एकत्र आले होते. मालिकेत सूर्या दादाच्या रक्षणासाठी ‘शिवा’ची एन्ट्री झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. वाहिनीवर ८.३० ते ९.३० या दरम्यान ‘शिवा – दादा महासंगम’ असा सीक्वेन्स गेले काही दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या सगळ्या भागांना प्रेक्षकांचा देखील तुफान प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स
ऑनस्क्रीन तर या दोन्ही मालिकांच्या ‘महासंगम’चं सर्वांनीच कौतुक केलं. पण, या सगळ्या कलाकारांची ऑफस्क्रीन सुद्धा चांगलीच जोडी जमली होती. याचा एक अनसीन व्हिडीओ प्रेक्षकांसमोर आला आहे. हे सगळे कलाकार सूर्या दादाच्या घरात ‘नवरी नटली’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
“खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली काल बाई सुपारी फुटली” या गाण्यावर हे दोन्ही मालिकांमधले कलाकार थिरकले आहेत. दिशा परदेशी, स्वप्नील कणसे, कोमल मोरे, पूर्वा कौशिक, सृष्टी बाहेकर, अधोक्षज कऱ्हाडे, शाल्व किंजवडेकर, ईशा संजय, समृद्धी साळवली, महेश जाधव, जुई तनपुरे, विपुल काळे या सगळ्या कलाकारांनी ( Zee Marathi ) ‘नवरी नटली’ या लोकप्रिय गाण्यावर एकत्रितपणे डान्स केला आहे.
हेही वाचा : Video : बाबा रणबीर कपूरच्या टीमला चीअर करण्यासाठी राहा आली फुटबॉलच्या मैदानावर, आलिया भट्टसह लेकीचा व्हिडीओ व्हायरल
‘लाखात एक आमचा दादा’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकेतील ( Zee Marathi ) कलाकारांचं हे ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आशूचे एक्स्प्रेशन”, “सगळे स्वतःच्या धुंदीत नाचताय, पण छान नाचताय”, “बेस्ट नाचताय सगळेच”, “शिवा एक्स्प्रेशन”, “लय मोठा संगम”, “याला म्हणतात vibe”, “लय भारी”, “सगळेच खूप छान नाचत आहेत”, “unexpected collab”, “एकदम झकास” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.