Lakshmi Niwas : ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या जान्हवी आणि जयंत यांच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. हा लग्नसोहळा पुण्याजवळ असलेल्या एका भव्य महालात पार पडला. जान्हवीच्या लग्नासाठी दळवी कुटुंबीयांनी जय्यत तयारी केल्याचं मालिकेत पाहायला मिळालं. आता येत्या काळात मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट येणार आहेत. मात्र, सध्या या कलाकारांनी जान्हवीच्या लग्नसोहळ्यात पडद्यामागे काय-काय धमाल केली याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दळवी कुटुंबीयांनी जान्हवी आणि जयंतच्या लग्नात ऑफस्क्रीन कोळी गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणारे सगळे कलाकार एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षया देवधर, मीनाक्षी राठोड, स्वाती देवल, दिव्या पुगावकर, तन्वी कोलते, अनुज ठाकरे, निखिल राजेशिर्के, महेश फाळके हे सगळे कलाकार एकत्र येऊन ‘वसईच्या नाक्यावरी…’ या कोळी गाण्यावर थिरकले आहेत.

“गोमू तुझ्या गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट मला रविवारी” असे या गाण्याचे बोल असून हे गाणं एकनाथ माळी यांनी गायलं आहे. हे कोळीगीत विशेषत: लग्नसोहळ्यांमध्ये वाजवलं जातं. सध्या लग्नाचा सीझन सुरू असल्याने हे गाणं इन्स्टाग्राम रील्सवर सुद्धा व्हायरल झालं आहे. दळवी कुटुंबीयांनी जान्हवीच्या लग्नात एकत्र येऊन या गाण्यावर ठेका धरला आहे. “आम्ही नेहमीच एकत्र असतो #दळवी” असं कॅप्शन देत जान्हवीच्या भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दळवी कुटुंबीयांचा हा कोळी डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मस्तच नाचलेत सगळे”, “सुपर डान्स झकास”, “अक्षया रॉक्स”, “आगरी कोळी डान्स”, “एक नंबर”, “अंजली बाई मस्त डान्स”, “खूप छान” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी हा डान्स पाहून दिल्या आहेत.

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi lakshmi niwas dalvi family dances on koli song at jahnavi wedding video viral sva 00