Zee Marathi Lakshmi Niwas Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर नुकतीच ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका सुरू झालेली आहे. ही महामालिका सध्या टेलिव्हिजनवर एक तास प्रसारित केली जाते. या कौटुंबिक मालिकेला सध्या प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी यांनी या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत.

आपल्या मुलांची स्वप्न, हक्काचं घर, मुलींची लग्न यासाठी लक्ष्मी आणि श्रीनिवास मालिकेत दिवसरात्र कष्ट करताना दिसतात. पण, याबदल्यात घरात त्यांची दोन्ही मुलं त्यांना फारशी बरी वागणूक देत नाहीत. याउलट लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या भावना-जान्हवी या दोन्ही मुली त्यांच्याशी प्रेमाने वागत, आई-बाबांची काळजी घेत असतात. मालिकेत ( Zee Marathi ) सध्या भावनाच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे.

Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
Tanvi Malhara married to Pratham Mehta
२८ वर्षीय अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, ‘या’ मालिकेत साकारलेली मुख्य भूमिका; शाही सोहळ्याचे फोटो चर्चेत
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Lakshmi Niwas Fame Divya Pugaonkar marriage invitation card
‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई! शेअर केली लग्नपत्रिकेची खास झलक, २०२१ मध्येच पार पडलेला तिलक समारंभ
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Lakshami Niwas
Video : लग्नादिवशीच श्रीकांतचा अपघात होणार, भावनाच्या आयुष्यात नवीन वादळ येणार; प्रोमोवर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले…

हेही वाचा : “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…

‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकतोय 3 Idiots फेम अभिनेता

भावना ( अक्षया देवधर ) ज्या ऑफिसमध्ये काम करत असते, त्याचे मालक श्रीकांत असतात. त्यांना लहान मुलगी असते, त्यांच्या लेकीची आणि भावनाची एकमेकांशी चांगली गट्टी जमलेली असते. नातीला आईचं प्रेम मिळावं या भावनेने श्रीकांतची आई भावनाला लग्नाची मागणी घालते. भावनाच्या पत्रिकेत दोष असल्याने तिच्याशी लग्न करण्यास कोणीही तयार नसतं. पण, याकडे दुर्लक्ष करून श्रीकांतची आई श्रीकांत आणि भावनाचं लग्न ठरवते. अर्थात, हे लग्न श्रीकांतच्या घरच्या मंडळींना मान्य नसतं. यामुळे त्याचा अपघात घडवून आणायचा असा प्लॅन त्याचा मेहुणा करतो.

श्रीकांतच्या बहिणीची म्हणजेच सुपर्णा ही भूमिका मालिकेत सुप्रिती शिवलकर साकारतेय. तर, तिच्या नवऱ्याची रवीची भूमिका मालिकेत ‘3 Idiots’ फेम अभिनेता म्हणजेच दुष्यंत वाघ साकारत आहे.

दुष्यंत वाघने ‘3 Idiots’ या लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटात आमिर खान, मॅडी, शर्मन जोशी, करीना कपूर खान या दिग्गज कलाकारांसह स्क्रीन सेअर केली आहे. अभिनेत्याने या चित्रपटात ‘सेंटिमीटर’ ही भूमिका साकारली आहे. दुष्यंतची भूमिका चित्रपटात अगदी शेवटी आहे. कॉलेजमधल्या मिलिमीटरला रँचो स्वत:कडे बोलावून घेतो आणि त्यानंतर त्याला योग्य शिक्षण देतो. यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतं. या सीनमध्ये दुष्यतं वाघ झळकला आहे.

हेही वाचा : Video : फोन बघत रिक्षा चालवणाऱ्या चालकावर भडकली प्रसाद ओकची पत्नी! मंजिरी म्हणाली, “पैसे देऊन, जीव मुठीत घेऊन…”

zee marathi
3 Idiots चित्रपटात दुष्यंतची भूमिका ( zee marathi )

दरम्यान, सध्या दुष्यंत ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका ( Zee Marathi ) रोज रात्री ८ वाजता एक तास प्रसारित केली जाते.

Story img Loader