‘झी मराठी’ने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांची घोषणा केली होती. यानुसार या दोन्ही मालिकांच्या प्रक्षेपणाला आता सुरुवात झाली आहे. ‘पारु’ आणि ‘शिवा’मध्ये प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. यानंतर आता ‘झी मराठी’ लवकरच आणखी दोन नव्याकोऱ्या मालिका सुरू करणार आहे. या मालिकांचे प्रोमो आणि स्टारकास्ट याबाबत नुकतीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच ‘झी मराठी’वर सुरू होणार असून या मालिकेतून हिंदी कलाविश्वात नावाजलेला अभिनेता राकेश बापट छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार असल्याचं नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे. याशिवाय राकेशसह ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत वल्लारी विराज प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या दोन मुख्य कलाकारांशिवाय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ‘पुढचं पाऊल’ फेम अभिनेत्री शर्मिला शिंदेची झलक पाहायला मिळाली. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत झळकेल असं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.

हेही वाचा : तरुणाकडून श्वानाला बेदम मारहाण; व्हायरल व्हिडीओ पाहून रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “याला तुरुंगात…”

तसेच ‘झी मराठी’वर सुरू होणाऱ्या दुसऱ्या नवीन मालिकेचं नाव आहे ‘पुन्हा कर्तव्य आहे’. या मालिकेत अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

हेही वाचा : “लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत आहे!” अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…

हेही वाचा : “हा अत्याचार थांबवा…”, जुई गडकरी ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून संतापली, पोस्ट शेअर करत म्हणाली…

या दोन्ही मालिका नेमक्या किती वाजता प्रसारित केल्या जाणार, कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यातील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. तसेच ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक करण्यात आल्याची माहिती मराठी टीव्ही इन्फो या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. आता या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.