Zee Marathi Laxmi Niwas : ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय या मालिकेत प्रेक्षकांना दमदार कलाकारांची मांदियाळी देखील पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या भूमिका साकारणार आहेत. श्रीनिवास हे एका कार कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. तर, लक्ष्मी या मनापासून आपलं कुटुंब सांभाळत आहेत. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं, आपलं हक्काचं घर बनावं अशी या वयोवृद्ध जोडप्याची इच्छा असते. लक्ष्मी आणि श्रीनिवास तसेच त्यांच्या कुटुंबीयांची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
zee marathi new serial tula japnar aahe first glimpses
‘झी मराठी’वर नव्या मालिकांची नांदी! ‘लक्ष्मी निवास’ पाठोपाठ सुरू होणार ‘ही’ थ्रिलर मालिका, पाहा पहिली झलक
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

हेही वाचा : Video : अखेर सूरज चव्हाणला मिळणार हक्काचं घर! भूमिपूजन सोहळा पडला पार; म्हणाला, “दादांनी गरीबाच्या पोराला…”

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री नव्या मालिकेत झळकणार

‘लक्ष्मी निवास’ ( Zee Marathi ) या मालिकेत हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. परंतु, या प्रोमोमध्ये आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते तो म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो. या फोटोतून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री मीनाक्षी राठोड या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमध्ये झळकणार असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीच्या मालिकेत मीनाक्षीने देवकी ही भूमिका साकारली होती. तिच्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता पुन्हा एकदा मीनाक्षी या नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

मीनाक्षीने ती ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ( Zee Marathi ) झळकणार असल्याची माहिती इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत दिली आहे. सध्या तिच्यावर कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : वांद्रे रेक्लेमेशनजवळ बसलेले प्रिया-उमेश; दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात छापून आलेला फोटो, २५ वर्षांपूर्वीचा किस्सा ऐकून पिकला एकच हशा

Zee Marathi Laxmi Niwas
झी मराठीची नवीन मालिका ‘लक्ष्मी निवास’ : Zee Marathi Laxmi Niwas

दरम्यान, ‘झी मराठी’ची ( Zee Marathi ) ही नवीन मालिका मूळ ‘झी कन्नड’वरील टीआरपी टॉपर असणारी ‘लक्ष्मी निवासा’ मालिकेची रिमेक असणार आहे. ही नवीन मालिका नोव्हेंबर महिन्यात प्रसारित होण्याची शक्यता आहे. लवकरच या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येणार आहे.

Story img Loader