छोट्या पडद्यावरील मालिकांच्या प्रेक्षकवर्गात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संध्याकाळी ७ ते रात्री १०-११ वाजेपर्यंत घरोघरी मराठी मालिका पाहिल्या जातात. सध्या स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठी या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ सुरू आहे. टीआरपीमध्ये सातत्य राखण्यासाठी आता झी मराठी वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी मराठी’ वाहिनीवर ८ ऑगस्ट २०२२ पासून ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सुरू झाली होती. सुरूवातीला ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित केली जायची. यानंतर वाहिनीने २५ सप्टेंबर २०२३ पासून या मालिकेची वेळ बदलून रात्री ८.३० अशी केली. परंतु, आता दोन महिन्यांतच या मालिकेच्या वेळेत पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत होणार एन्ट्री! साकारणार महत्त्वाची भूमिका

येत्या २७ नोव्हेंबरपासून ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दोन महिन्यांत मालिकेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यामागचं काय कारण आहे? याबद्दल गेले काही दिवस प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर मालिकेच्या वेळेत बदल करण्याचं कारण आता समोर आलं आहे.

‘जाऊ बाई गावात’ या नव्या शोसाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी अर्थात प्रेक्षकांचा लाडका राणादा पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार आहे. हा नवा शो २७ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रक्षेपित करण्यात येणार असल्याने ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.

हेही वाचा : “अखेरचा हा तुला दंडवत…” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्रीची भली मोठी भावुक पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत कश्यप परुळेकर,पल्लवी पाटील आणि अनिता दाते-केळकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांना नव्या वेळेत रात्री दहा वाजता पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi nava gadi nava rajya serial time will change from 27 november 2023 sva 00
Show comments