‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) या मालिकेत सातत्याने ट्विस्ट येताना दिसतात. सध्या मालिकेत जहागिरदार कुटुंबात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. दुर्गा आई होणार असल्याचे समजल्यानंतर घरांतील सर्वांनाच खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वजण दुर्गाचे लाड करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दु्र्गा या क्षणाची वाट पाहत होती. आता तिची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. मात्र, मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दुर्गा पायऱ्यांवरून खाली पडणार…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा एक प्रोमो शेअर कऱण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की एजेचा वाढदिवस साजरा केला जात आहे. घरातील सर्व मंडळी आनंदात असल्याचे दिसत आहे. वाढदिवसानिमित्ताने एजे एक महत्वाची घोषणा करतो. ही घोषणा लीला संदर्भात आहे. एजे म्हणतो, “माझ्या वाढदिवसादिवशी माझी बिझनेसची ५१ टक्के पार्टनरशिप लीलाच्या नावावर केली आहे.” त्यानंतर लीला काही पेपर्सवर सह्या करताना दिसत आहे. त्यानंतर डान्सदेखील पाहायला मिळत आहे. लीला एजे घरातील सर्वांचे फोटो असलेली मोठी फ्रेम वाढदिवसांचं गिफ्ट देते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की लीला किशोरला म्हणते, किशोर सर, आपण दुर्गाला खाली बोलवूया का? मी घेऊन येते ना तिला प्लीज.” असे म्हणून लीला दुर्गाला आणण्यासाठी वरच्या मजल्यावर तिला खोलीत जाते. दुर्गा पुढे तर लीला तिच्या मागे दिसत आहे.पायऱ्यांवरून खालून येताना दुर्गाचा पाय घसरतो व ती खाली पडते. पायऱ्यांवरून घसरत ती खाली जमिनीवर येते. ती तिच्या पोटावर पडते. तिच्या डोक्यालादेखील मार लागलेला या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. लीला मोठ्याने दुर्गा म्हणून ओरडते. तर इतर सर्वांना धक्का बसल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यानंतर लीला, एजे दुर्गाकडे धावत गेल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लीलामुळे दुर्गावर कोसळणार दुःखाचा डोंगर”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीला ही सर्वांशी छान वागते. मात्र लक्ष्मी, दुर्गा व सरस्वती यांना लीला आवडत नाही. त्यामुळे लीला विरूद्ध लक्ष्मी, दुर्गा व सरस्वती असे दोन गट पाहायला मिळतात. या सगळ्यात किशोरला अभिरामला जे घरात स्थान मिळते, ते आवडत नाही. तो त्याचा तिरस्कार करतो. लीला व अभिराममध्ये दुरावा यावा यासाठी तो सातत्याने प्रयत्न करताना दिसतो. आता दुर्गा पडण्यामागे नेमके जबाबदार आहे, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.