अभिनेता क्षितीश दातेने अभिनयाच्या जोरावर मनोरंजनविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात त्याने साकारलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. याच भूमिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळवून दिली. आता क्षितीश पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षितीश छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेत तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.  “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची ऐतिहासिक चरित्रगाथा मालिकेतून मांडण्यात येणार आहे. टिळकांचा प्रभावी इतिहास या मालिकेतून छोट्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. या मालिकेत क्षितीश लोकमान्य टिळकांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा >> Video: रूममध्ये सिंहाला बघताच जोरात ओरडू लागली शहनाज गिल, पुढे असं काही घडलं की…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा >> Drishyam 2: ‘दृश्यम २’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; हॉटस्टार, नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राईम? जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत.

हेही वाचा >> “मी लग्न करू की नको?” चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली, “करून टाका माझा…”

क्षितीशने नाटक, मालिक व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘लोकमान्य’ मालिकेत क्षितीशसह अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘दशमी क्रिएशन्स’ने मालिकेची निर्मिती केली असून स्वप्निल वारके यांनी दिग्दर्शन केले आहे. २१ डिसेंबरपासून बुधवार-शनिवार रात्री ९:३० वाजता या मालिकेचे प्रसारण होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi new serial kshitish date who play cm eknath shinde in dharmveer and spruha joshi to play lead role in lokmanya kak