Zee Marathi New Serial Lakshmi Niwas Promo : ‘झी मराठी’ने वाहिनीवर येत्या २३ डिसेंबरपासून मल्टिस्टारर कौटुंबिक मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका केव्हा भेटीला येणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर येत्या २३ तारखेपासून दररोज रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल. या मालिकेचे सुरुवातीचे काही भाग १ तास प्रदर्शित केले जाणार आहेत.

‘झी मराठी’च्या ( Zee Marathi ) या नव्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना लक्ष्मी आणि श्रीनिवास या जोडप्याची कथा पाहायला मिळणार आहे. श्रीनिवास कंपनीतून रिटायर झाल्यावर कौटुंबिक परिस्थिती कशी बदलते. मुलांचं तिरसट वागणं, कुटुंबापासून विभक्त राहण्याचं स्वप्न पाहणं या सगळ्यात आई-बाबांची होणार फरपट या गोष्टी प्रोमोत लक्ष वेधून घेतात. लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची दोनच स्वप्न असतात एक म्हणजे हक्काचं छान असं घर बांधावं आणि दुसरं आपल्या मुलींची लग्न थाटामाटात करुन द्यावीत.

lakshmi niwas fame divya pugaonkar kelvan ceremony
‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवीचं ऑफस्क्रीन केळवण! सहकलाकारांनी केलेली खास तयारी, खऱ्या आयुष्यातील जयंत आहे तरी कोण?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chiki Chiki Bubum bum marathi movie
चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; बॅकबेंचर्स मित्रमंडळींच्या रियुनियनची धमाल मस्ती
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Mahakavi Kalidas Natya Mandir Theatre reserved for parking lot
वाहनतळासाठी नाट्यगृह आरक्षित; महाकवी कालिदास नाट्यमंदिरातील प्रकार
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”

हेही वाचा : Year Ender 2024 : विकी कौशलचं ‘तौबा-तौबा’ ते ‘सजनी’; वर्षभरात ‘या’ १० गाण्यांनी घातला धुमाकूळ, पाहा संपूर्ण यादी…

लक्ष्मी आणि निवासच्या मोठ्या मुलीच्या म्हणजेच भावनाच्या ( अक्षया देवधर ) पत्रिकेत दोष असल्याने तिचं लग्न ठरत नसतं. पण, या सगळ्याला भावना मोठ्या धीराने आणि संयमाने तोंड देत असल्याचं मालिकेच्या प्रोमोत पाहायला मिळणार आहे. आता या सगळ्यातून श्रीनिवास आणि लक्ष्मी कसा मार्ग काढणार, त्यांची स्वप्न पूर्ण होणार की नाहीत? याचा उलगडा २३ डिसेंबरपासून होईल.

मालिकेची दमदार स्टारकास्ट

‘लक्ष्मी निवास’ ( Zee Marathi ) या मालिकेत हर्षदा खानविलकर, निखिल राजेशिर्के, सौरभ गोखले, कुणाल शुक्ला, अनुज ठाकरे, तुषार दळवी, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड, तन्वी कोलते, अक्षया देवधर, महेश फाळके, दिव्या पुगावकर यांच्यासह काही नवीन कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व गाजवणारा अभिनेता राजेश शृंगारपुरे अनेक वर्षांनी या शोच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजन विश्वाच्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अभिनेत्याची झलक नव्या प्रोमोमध्ये लक्षवेधी ठरली आहे. याशिवाय राजेशच्या आईची भूमिका मालिकेत अभिनेत्री राधिका बर्वे साकारणार आहे. यावरून मालिकेत खूप मोठी स्टारकास्ट असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, ‘झी मराठी’ ( Zee Marathi ) वाहिनीवरील ही आगामी ‘लक्ष्मी निवास’ मालिका, ‘झी कन्नडा’ची टीआरपी टॉपर मालिका ‘लक्ष्मी निवासा’चा मराठी रिमेक आहे. सध्या छोट्या पडद्यावरील प्रत्येक मालिकांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या सगळ्यात नव्याने सुरू होणाऱ्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader