Zee Marathi Lakshmi Niwas : ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या अलीकडेच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात नव्या मालिकेची घोषणा केली. या मालिकेचं नाव आहे ‘लक्ष्मी निवास’. ही कथा आहे श्रीनिवास आणि लक्ष्मी यांची, रिटायरमेंट झाल्यावर आपल्या कुटुंबाबरोबर छान वेळ घालवायचा. मोठं, प्रशस्त घर असावं अशी या दोघांची इच्छा असते. पण, मुलं आणि सुनांचा असमजूतदारपणा, मुलीच्या पत्रिकेतला दोष असे बरेच अडथळे त्यांच्या वाटेत आहेत. या सगळ्यावर मात करून हे वयोवृद्ध जोडपं आपलं स्वप्नातलं निवास कसं बांधणार याची गोष्ट या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असणार आहेत. मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : “स्मितामुळे मी सिनेमात आलो, नाहीतर…”, नाना पाटेकरांचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता? सांगितली ४६ वर्षांपूर्वीची आठवण

‘लक्ष्मी निवास’च्या नव्या प्रोमोमध्ये ( Zee Marathi ) श्रीनिवासला त्यांचे ऑफिसचे कर्मचारी सर, “रिटायरमेंटच्या पैशातून मुलींची लग्न करा, घर बांधा आणि मस्त राजासारखे जगा” असा सल्ला देतात. पण, प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडतं. त्यांची मुलं, सुना म्हणावं तसा त्यांचा आदर करत नाहीत. यावेळी लक्ष्मी त्यांची पत्नी अत्यंत सामंजस्याने सगळ्या गोष्टी हाताळते. घरात होणारी भांडणं पाहून श्रीनिवास प्रचंड अस्वस्थ होतात. आता लक्ष्मी आणि श्रीनिवास आई-बाबा म्हणून कर्तव्य निभावणार की स्वतःची स्वप्न पूर्ण करणार? हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकणार अक्षया देवधर आणि दिव्या पुगांवकर ( Zee Marathi Lakshmi Niwas )

हेही वाचा : मराठी सिनेमे हिंदीत डब का होत नाहीत? नाना पाटेकरांचा सवाल; प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’बद्दल म्हणाले…

नवीन मालिका केव्हा सुरू होणार? ( Lakshmi Niwas )

‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करत ‘झी मराठी’ने ( Zee Marathi ) या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही नवीन मालिका येत्या २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दररोज रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत हर्षदा खानविलकर, तुषार दळवी यांच्यासह अक्षया देवधर, कुणाल शुक्ला, दिव्या पुगांवकर, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड, अनुज ठाकरे, निखिल राजशिर्के असे दमदार कलाकार झळकणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi new serial lakshmi niwas promo date and time announced watch video sva 00