Zee Marathi New Serial Lakshmi Niwas : ‘झी मराठी’ वाहिनीवर आता एका मागोमाग एक अशा नव्या मालिका दाखल होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. ही मालिका येत्या २३ सप्टेंबरपासून सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘सावळ्याची जणू सावली’ या नव्या मालिकेची चर्चा असतानाच आता वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केली आहे.

“स्वत:च्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट…‘घर नावाचं स्वप्न’ कुणी पाहिलं तर कुणी जगलं…लक्ष्मी निवास लवकरच येतेय तुमच्या भेटीला…” असं सांगत नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. यामध्ये बॅकग्राऊंडला घर बनत असल्याचं पाहायला मिळतं. तर, जुन्या काळातील स्कूटरवर बसून एक जोडपं या घराकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचं दिसतं. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘लक्ष्मी निवास’. ही कौटुंबिक विषयावर आधारलेली मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे.

zee marathi laxmi niwas new promo
‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकणार ‘ही’ जोडी! ‘त्या’ दोघांना तुम्ही ओळखलंत का? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
zee marathi new serial laxmi niwas harshada khanvillkar and tushar dalvi in lead role
‘झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! हर्षदा खानविलकर अन् तुषार दळवी प्रमुख भूमिकेत, पाहा पहिला प्रोमो
zee marathi laxmi niwas upcoming serial sukh mhanje nakki kay asta fame actress
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार! ‘त्या’ फोटोत दिसली झलक
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar will get marriage in November
पृथ्वीक प्रतापनंतर ‘हा’ लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख विचारताच म्हणाला…
akshaya deodhar comeback on zee marathi
पाठकबाईंचं पुनरागमन! अक्षया देवधर ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार, सोबतीला असेल ‘हा’ अभिनेता

हेही वाचा : आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”

‘झी मराठी’वर सुरू होणार नवीन मालिका

‘झी मराठी’ ( Zee Marathi ) वाहिनीवरील ही आगामी ‘लक्ष्मी निवास’ मालिका, ‘झी कन्नडा’ची टीआरपी टॉपर मालिका ‘लक्ष्मी निवासा’चा मराठी रिमेक आहे. ‘लक्ष्मी निवास’मध्ये प्रमुख भूमिकेत कोण झळकणार याचा खुलासा अद्याप वाहिनीकडून करण्यात आलेला नाही. मात्र, या पहिल्या प्रोमोला प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी व्हॉइस ओव्हर दिल्याचं अगदी प्रोमो ऐकल्यावर लगेच लक्षात येतं. त्यामुळे प्रमुख भूमिकेत त्या झळकणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.

हेही वाचा : वर्षभरानंतर ‘झी मराठी’ची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिला दुजोरा

‘राजश्री मराठी’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी या ‘झी मराठी’वर ( Zee Marathi ) एकत्र झळकणार असल्याची शक्यता आहे. मात्र, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. आता या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : गणेशोत्सवात अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रेक्षकांसाठी खास भेट; ‘पार्वती नंदना’ अल्बम प्रदर्शित होताच म्हणाल्या, “आपल्या नातवाला…”

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ( Zee Marathi ) या नव्या मालिकेच्या प्रसारणाची तारीख अन् वेळ लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीकडून जाहीर करण्यात येईल. आता या कौटुंबिक मालिकेत नेमके कोण-कोण कलाकार झळकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. याशिवाय सध्या छोट्या पडद्यावरील प्रत्येक मालिकांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader