Zee Marathi Laxmi Niwas : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याचा पहिला भाग नुकताच पार पडला. यंदा वाहिनीला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे खास रौप्य सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. याच खास दिनाचं औचित्य साधत ‘झी मराठी’ने ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लक्ष्मी निवास’ ( Zee Marathi ) या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या प्रमुख भूमिका असतील याचा अंदाज नेटकऱ्यांनी आधीच बांधला होता. त्यानुसार पहिल्या प्रोमोची झलक समोर आल्यावर नेटकऱ्यांचा अंदाज अचूक ठरल्याचं समोर आलं आहे. आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणारं वयोवृद्ध जोडपं लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या आयुष्यावर बेतलेली गोष्ट म्हणजे ‘लक्ष्मी निवास’.

हेही वाचा : Zee Marathi Awards : आईच नंबर वन चाहती! एजेचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणली डायरी, राकेश म्हणाला…; पुरस्कार मिळताच मायलेक झाले भावुक

‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा पहिला प्रोमो आला समोर

आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न लक्ष्मी अन् श्रीनिवास यांनी पाहिलेलं असतं. मालिकेच्या प्रोमोमध्ये हे दोघंही एका जुन्या स्कूटरवरून प्रवास करताना दिसतात. कुटुंब, नोकरी, मुलींची थाटामाटात लग्न, पैशांची जुळवाजूळव या सगळ्या जबाबदाऱ्या निभावून आता लक्ष्मी आणि श्रीनिवास हक्काचं घर कसं बांधणार याचा प्रवास मालिकेतून ( Zee Marathi ) प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss 18 मध्ये मोठा ट्विस्ट! डबल एव्हिक्शनमध्ये ‘हे’ दोन सदस्य घराबाहेर, सलमान खान घेणार अविनाश मिश्राची शाळा

हेही वाचा : Video : ‘अमी जे तोमार’वर माधुरी-विद्याची जबरदस्त जुगलबंदी! ५७ वर्षीय ‘धकधक गर्ल’च्या दिलखेचक अदांनी सारेच झाले थक्क…

झी मराठी वाहिनीवर सुरू होणार नवीन मालिका लक्ष्मी निवास – Zee Marathi Laxmi Niwas

हेही वाचा : ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकणार ‘ही’ जोडी! ‘त्या’ दोघांना तुम्ही ओळखलंत का? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

“एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोबतीनेच बनतं ‘लक्ष्मीनिवास’!” असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीने याचा पहिला प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. ही मालिका केव्हा व कधी सुरू होणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र, या कौटुंबिक मालिकेत ( Zee Marathi ) दमदार कलाकरांची मांदियाळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi new serial laxmi niwas harshada khanvillkar and tushar dalvi in lead role watch first promo sva 00